Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज दिनांक 13 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हावर देखील बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज काही महत्त्वच्या घडामोडी घडू शकतात. दुसरीकडे राज्यातील मुंबई, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांसह 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला आहे. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अस्तिक कुमार पांडे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.