आज दिनांक 17 ऑक्टोबर 2022 जाणून घेऊयात राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. आज राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा निकाल आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आम्हीच बाजी मारणार असा दावा जवळपास सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र गुलाल कोण उधळणार हे पहावं लागणार आहे. दुसरीकडे आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यामध्ये ही लढत आहे. येत्या 19 ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात.