Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Big breakingImage Credit source: tv9
मुंबई : आज दिनांक 26 ऑक्टोबर 2026 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. आज काँग्रेससाठी महत्त्वाचा दिवस आहे. काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आज अध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आव्हान दिले होते. मात्र या निवडणुकीत थरुर यांचा खर्गे यांनी 6,825 मतांनी पराभव केला. काँग्रेसमध्ये 24 वर्षानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आज मलिकार्जून खर्गे हे अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणार आहेत.