मुंबई : आज दिनांक 3 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसरा मेळावा जसा-जसा जवळ येत आहे. तसं -तसं राज्यातील राजकारण देखील तापत असल्याचं पहायला मिळत आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा 26 वा दिवस आहे. भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटक राज्यात आहे. आज यात्रेला मैसूरमधून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे आज सोनिया गांधी या देखील कर्नाटकला जाण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात प्रत्यक अपडेट
राज ठाकरे 4 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार होते
आता 6 तारखेला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार
राज ठाकरे दसरा मुंबईत साजरा करणार
मिरा भाईंदर परिसरातील शिंदे गटाकडून बॅनरबाजी
बीकेसी येथील दसरा मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन
शिवसेना शाखा प्रमुख महेश शिंदे यांनी लावलं बॅनर
बॅनरवर आमदार प्रताप सरनाईक,पूर्वेस सरनाईक आणि
शाखा प्रमुख महेश शिंदे यांचे आवाहन करत असताना फोटो
पतीने दारूच्या नशेत पत्नीला दारू पाजून गळफास देत केली पत्नीची हत्या
निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथील घटना
आशा प्रेमा वास्कली असे मृत पत्नीचे नाव
मध्यप्रदेश शेतमजुरीसाठी आले होते हे दाम्पत्य
याप्रकरणी पती पोलिसांच्या ताब्यात
लासलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
मुंबई सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील शिवाजी पार्क परिसरात दाखल
शिवाजी पार्क बिट चौकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक
या बैठकीला सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, डीसीपी प्रणय अशोक, डीसीपी शिवाजी राठोड आणि इतर अधिकारी उपस्थित.
शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने महत्वाची चर्चा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीममध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. कशी असेल प्लेइंग 11. वाचा सविस्तर
इराणहून निघालेलं महान एअरलाइन्सचं विमान चीनमध्ये सुरक्षित पोहोचलं.
विमानात बॉम्ब असल्याची बातमी अफावच ठरली.
विमानाचं सुरक्षित लँडिंग
सकाळी तेहरानहून निघाल्यावर विमानात बॉम्ब असल्याची बातमी धडकली होती
साडे नऊ वाजेच्या सुमारास भारतात उतरण्याची परवानगी मागितली होती
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने परवानगी नाकारली होती
शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यावर गिरीश महाजन यांचं महत्वाचं विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे नेते जाणार नाहीत
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे काही ठरलं असेल तर त्यानंतर निर्णय घेतला जाईल
पुणे-मुंबई महामार्गावरची वाहतूक दीड तासांनी सुरू झाली
चांदणी चौकातील ब्लास्टसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती
ब्लास्ट झाल्यानंतर दीड तासानंतर ही वाहतूक पूर्वरत करण्यात आली
त्यापूर्वी शहरातून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत होत्या
भारत जोडो यात्रेसाठी सोनिया गांधी कर्नाटक दौऱ्यावर
सोनिया गांधी 6 रोजी होणार सहभागी
प्रियांका गांधीही सहभागी होण्याची वर्तवली शक्यता
केरळ नंतर आता कर्नाटकात भारता जोडोचा नारा
माजी आमदार राम पंडागळे हजारो कार्यकर्त्यांसोबत आज शिंदे गटात प्रवेश करणार
कांदिवली इथल्या दामू नगरचे रहिवासी असलेले राम पंडागळे वर्षाच्या बाहेर पोहोचले
कामाची पद्धत आवडल्याने हजारो दलित बांधव एकनाथ शिंदेच्या गटात आज सामिल होणार असल्याची दिली माहिती…
तो फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत असताना पाकिस्तानी प्रेक्षक पर्ची-पर्ची अशा घोषणा का देत होते? त्याचा अर्थ काय? वाचा सविस्तर
मुंबई महापालिकेसाठीच्या भाजपाच्या मिशन 150 वर किशोरी पेडणेकरांचं टीकास्त्र
मिशन 150 च्या बॅनरनं जागा झोळीत येत नाहीत
निवडून येण्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असावी लागते
भाजपकडून सेनेची लोकांशी जुळलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे
किशोरी पेडणेकरांचा भाजपावर घणाघात
दुर्गाष्टमी निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर येथे भेट देऊन मुंबादेवीचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला.
माजी आमदार राजपुरोहित, प्रेम शंकर पांडे, हेमंत जाधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.
कालच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादववर अन्याय झालाय असं अनेकांना वाटतय, त्यामागे एक कारण आहे, वाचा सविस्तर
पुण्यात जेवढे पुरस्कार दिले जातात तेवढे पुरस्कार कुठंच दिले जात नाही
पुरस्कार देणारे, घेणारे आणि ठरवणारे आणि स्वीकारणारे ठराविकच असतात
सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरून पोलीस खात्यातील नोकरी सोडली
त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देतो असं आश्वासन दिलं
पण ते मी पूर्ण करू शकलो नाही. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
गिरीश महाजन म्हणाले…
“मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीला होणार”
पालकमंत्री नियुक्ती ही तात्पुरती
म्हणून मंत्र्यांना एकापेक्षा अधिक पालकमंत्रीपद आहेत
भारतात लँडिंगची परवानगी मागितली…
मात्र दिल्ली एअरपोर्टद्वारे लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली आहे.
इराणमधील तेहरानहून चीनच्या दिशेने निघाले होते विमान
‘महान फ्लाइट’ च्या या विमानावर अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर
दसरा मेळाव्याबाबत मंजुळा गावित यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा
धुळ्यातून दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येणार 100 बसेस…
दसरा मेळाव्यानिमित्त वर्षावर आमदारांच्या भेटीगाठी सुरू
सामना संपल्यानंतर डेविड मिलरने सांगितलं दोघांमध्ये काय घडलं? नेमका काय संवाद झाला? वाचा सविस्तर
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित
येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार मतदान तर 6 नोव्हेंबरला होणार मतमोजणी
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर रिक्त झाली होती जागा
पत्नीच्या मृत्यू तर दोन मुली गंभीर जखमी
दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिंदे समर्थक आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या गळ्यात भाजपाचं उपरणं
भाजपाच्या कार्यक्रमात शिंदे समर्थक नरेंद्र बोंडेकर उपस्थित
फडणवीसांसह नरेंद्र बोंडेकर मंचावर उपस्थित
फडणवीसांकडून बोंडेकरांचं कौतूक
राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण
लाइव्ह मॅचमध्ये मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठानमध्ये वाद झाला. दोघांमधील भांडण फक्त शाब्दीक वादापुरता मर्यादीत नव्हते. नेमकं काय झालं? ते वाचा सविस्तर
टेरर फंडिंग च्या माध्यमातून स्थापन केल्या होत्या अनेक एनजीओ
एनजीओच्या माध्यमातून सुरू होती देश विघातक कृत्य
एटीएसने न्यायालयात दिलेल्या माहितीतून धक्कादायक खुलासा
पंचवीस वर्षात देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा होता पी एफ आय चा कट
औरंगाबाद शहरांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी उघडण्यात आले होते कॅम्प
बंद द्वार प्रशिक्षण देण्याच्या ही सुरू होत्या मोहिमा
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या चौकशीतून माहिती उघड
बसेसमध्ये लोक आणली जातील. मात्र शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्यात लोक स्वतःहून येतील
राष्ट्रवादीने ताकद लावली तर जागाही पुरणार नाही. शिवसेनेलाच तेथे जागा पुरणार नाही
स्वतःच्या हिमतीवर ते ताकद लावून सभा घेत असतील तर राष्ट्रवादीला ताकद लावण्याची काय गरज?
माझ्या दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा.
दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र 5 तारखे नंतर लोकांच्या हिताचे काम व्हायला हवीत.
महाजनांचे दावे एकनाथ खडसेंनी फेटाळले
खडसे म्हणाले…
मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली
पण मिटून टाका मी असं काही बोललोच नाही
स्वराज्यचा राज्य दौरा 7 ऑक्टोबरपासून सुरु करणार
अंबाबाईच्या दर्शनानंतर संभाजीराजे यांची माहिती
दसऱ्याच्या सिमोल्लंघनानंतर दौरा सुरु होणार
संभाजीराजे काय करणार हे काळ ठरवेल
दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा
मातोश्रीबाहेर राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
बॅनरच्या माध्यमातून दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवसेनेला शुभेच्छा
मिलिंद नार्वेकर शिंदेगटात प्रवेशाची चर्चा
पण त्यांच्या एका कृतीतून त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत
नार्वेकर यांनी शिवाजी पार्कात जाऊन दसरा मेळाव्याच्या तयारीची केली पाहाणी
– राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौरावर असून आज नियोजन बैठकीत उपस्थित होणार
आज विविध योजनांच्या मान्यता मिळणार असून या संपुर्ण घडामोडी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधि तेजस मोहतुरे
रत्नागिरी-माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांची नाव न घेता टीका
जिल्हा नियोजनाच्या कामांसाठी माझ्या पीएचा फोन अधिकाऱ्यांना कधीच येणार नाही
आधीच्या पालकमंत्र्यांनी पाडलेला पायंडा माझ्या कार्यपद्धतीत नसेल
उदय सामंत यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतील व्हिडिओ व्हायरल
‘तीन तास ऑफिसबाहेर बसवूनही अमित शाहांनी एकनाथ खडसेंना वेळ दिला नाही’
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंबाबत मोठा दावा
एकनाथ खडसे, रक्ष खडसे अमित शाहांच्या भेटीसाठी गेले होते
मात्र खडसेंना तीन तास वेटींगवर ठेवूनही शाहांनी वेळ दिली नाही
भाजप नेते गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट
अधिकाऱ्यांनो कुणाच्याही दबावाला बळी पडू नका – अजित पवार
आम्ही सत्तेत कधी येऊ कळणार नाही – अजित पवार
आता दमदाटी करणाऱ्यांची सत्ता जाणार – अजित पवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर
अमित शहा वैष्णोदेवीचे दर्शन घेणार
आज संध्याकाळी पाच वाजता अमित शहा जम्मूला रवाना होणार
शहा यांचा तीन दिवशीय दौरा
श्रीनगर आणि बारामुल्ला जिल्ह्याचा दौरा करणार
धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला
कर्जतकडून बदलापूरकडे येणाऱ्या गाड्यांना दहा मिनिटे उशिर
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना फटका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज 26 वा दिवस
भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटक राज्यात
मैसूरमधून आज यात्रेला होणार सुरुवात
सोनिया गांधी आज कर्नाटकला जाण्याची शक्यता
6 तारखेला भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी सहभागी होणार