Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breaking
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Oct 05, 2022 | 7:37 AM

मुंबई : आज दिनांक 4 ऑक्टोबर 2022. दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) तयारीसाठी आता फक्त आजचा एकद दिवस शिल्लक उरला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसीवर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. उद्या होणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसंच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. या दृष्टीने राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. त्याच प्रमाणे अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज फैसला होणार आहे. या सर्व राजकीय घडामोडीत सर्वसामान्यांना पुन्हा एक महागाईचा झटका बसलाय. सीएनजीच्या किंमतीत (CNG Rates Hike) वाढ झाली आहे. राजकारणासोबत महाराष्ट्राशी निगडीत प्रत्येक घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.