मुंबई: आज दिनांक 6 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. बुधवारी बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात दोन्हीही बाजुने जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमीवर आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने ड्रग्जसह एका नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 80 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.