SC Hearing on MLA Disqualification Live | पुण्यात मोठ्या घडामोडी, संजय राऊत आंदोलक MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला

| Updated on: Feb 22, 2023 | 6:06 AM

Supreme Court Hearing on MLA disqualification Live Updates : निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील याचिकेवर आजचा सुनावणी झाली. आता याबाबत उद्या दुपारी सुनावणी होणार आहे. तर राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू आहे. याबाबतचे सर्व महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

SC Hearing on MLA Disqualification Live | पुण्यात मोठ्या घडामोडी, संजय राऊत आंदोलक MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला

मुंबई : सध्या विविध घडामोडी घडत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता खासदार संजय राऊत ही मैदानात उतरणार आहेत. संजय राऊत 1 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झालेत. बालगंधर्व चौकात या विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरूच आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आज सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आता उद्या सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल आहे त्यावर उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. यासह देशासह राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Feb 2023 10:53 PM (IST)

    पुण्यात मोठ्या घडामोडी, संजय राऊत आंदोलक MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला

    पुणे : 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमपीएससी परीक्षेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला

    पुण्यात महत्त्वाच्या घडामोडी

    याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय

    याशिवाय अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: विद्यार्थ्यांना फोन करुन केलं आंदोलन मागे घेण्याचं केलं आवाहन

  • 21 Feb 2023 09:39 PM (IST)

    एसटी कर्मचारी येत्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार

    मुंबई :

    – एसटी कर्मचारी येत्या 28 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार

    – मागण्या शासनाने मान्य न केल्याने एसटी कर्मचारी आक्रमक

    – आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं एसटी कर्मचाऱ्यांना वाटू लागल्याने एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम

  • 21 Feb 2023 09:38 PM (IST)

    पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एकाची तब्येत बिघडली

    पुणे : 

    पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडली

    डॉक्टरांकडून तपासणी सुरू

    डॉक्टर आंदोलनस्थळावर दाखल

    विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी

  • 21 Feb 2023 07:07 PM (IST)

    NIA कडून आज देशातल्या 76 ठिकाणी छापेमारी

    मुंबई : 

    NIA कडून आज देशातल्या 76 ठिकाणी छापेमारी

    महाराष्ट्रातील संजय बियाणी हत्या प्रकरणाचे NIA कडे महत्वाचे धागेदोरे

    काही कब्बडी प्लेयर्सचाही या कटात सहभागी असल्याचं उघड

    मुंबईतल्या भायखळा परिसरात NIA कडून आज छापा

    छापेमारीत 9 पिस्टल, रिव्हॉल्व्हर्स, रायफल, दीड कोटी रोख रक्कमही जप्त

    आंतरराष्ट्रीय रॅकेटचे कनेक्शन NIA च्या तपासात समोर आलेत

  • 21 Feb 2023 06:33 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटलांचा एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना फोन

    पुणे :

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटलांचा एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना फोन

    अध्यक्षांकडे मांडला एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न

    काल जयंत पाटलांनी घेतली होती आंदोलकांची भेट

    आज सकाळी जयंत पाटलांनी आयोगाच्या अध्यक्षांसोबत केली चर्चा

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांची माहिती

  • 21 Feb 2023 06:21 PM (IST)

    कसब्याच्या प्रचारात आज खासदार उदयनराजे भोसले उतरणार

    पुणे : 

    – कसब्याच्या प्रचारात आज खासदार उदयनराजे भोसले उतरणार,

    – भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ रोड शो काढणार

    – मांगीरबाबा चौकापासून सूरु होणार रोड शो,

    – रोड शोच्या माध्यमातून भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

  • 21 Feb 2023 05:35 PM (IST)

    UPI सेवेचा परदेशातही डंका

    या देशातील पे नाऊसोबत करार

    परदेशातही करता येणार सहज व्यवहार

    प्रवाशी, विद्यार्थी, व्यापारी यांना होणार फायदा

    पंतप्रधानांच्या हस्ते सुविधेचा आजपासून श्रीगणेशा, वाचा बातमी 

  • 21 Feb 2023 05:22 PM (IST)

    आमदार सत्यजीत तांबे आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला

    नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली.

    सत्यजीत तांबे आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं

  • 21 Feb 2023 04:50 PM (IST)

    करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

    नवीन कर व्यवस्थेत लवकरच तीन सवलती

    कर व्यवस्था आकर्षक करण्यासाठी नवीन प्रस्ताव

    नोकरदारांपासून अग्निवीरापर्यंत सर्वांनाच घेता येईल लाभ

    कोणत्या आहेत या तीन कर सवलती, वाचा एका क्लिकवर

  • 21 Feb 2023 04:25 PM (IST)

    युक्तिवाद उद्या लगेच पूर्ण होणार? : अनिल देसाई

    अनिल देसाई यांची प्रतिक्रिया :

    सत्तासंघर्षाच्या याचिकेवरील युक्तिवाद उद्या लगेच पूर्ण होणार नाही. गुरुवारपर्यंत युक्तिवाद चालेल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली

  • 21 Feb 2023 04:23 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रेची कारवाई सुरु असताना मुख्यमंत्रिपदाची शपथ देणं घटनात्मक आहे का? – अनिल परब

    अनिल परब यांची प्रतिक्रिया :

    “जे 16 आमदार आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे हे पहिले आहेत. ज्यांच्यावर अपात्रतेचा दावा करण्यात आलाय अशा माणसाला मुख्यमंत्रिपदाची शपथ देणं हे घटनात्मक आहे का? असा प्रश्न विचारला गेलाय. या विषयाची आठ मुद्दे आहेत. यावर सुनावणी सुरु आहे. उद्या उर्वरित सुनावणी होईल”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.

  • 21 Feb 2023 04:04 PM (IST)

    रत्नागिरी

    काजूच्या बागेत लागलेला वणाव विझवताना शेतकरी होरपळला

    हातखंबा तारवेवाडीत घडली धक्कादायक घटना

    दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ

    घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच घटनास्थळी हजर

  • 21 Feb 2023 04:03 PM (IST)

    Supreme Court Hearing Live | सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली

    Supreme Court Hearing Live Updates | सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सत्तासंघर्षवारील आजची सुनावणी संपली आहे. उर्वरित सुनावणी ही आता बुधवारी 22 फेब्रुवारीला पार पडणार आहे.

  • 21 Feb 2023 04:00 PM (IST)

    Shivsena Case Live : सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली

    आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

    उद्या दोन्ही गटांना लेखी स्वरुपात युक्तिवाद मांडण्याचे कोर्टाचे आदेश

    उद्या दुपारपर्यंत कपिल सिब्बल युक्तिवाद सादर करतील

    दुपारनंतर शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करतील

  • 21 Feb 2023 03:59 PM (IST)

    Supreme Court Hearing Live | कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे

    Supreme Court Hearing Live | कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील मुद्दे

    1. हे जर थांबल नाही तर वेगळा पायंडा पडेल. निवडणूक आयोगानं दुसरी बाजू गृहित न धरता निर्णय दिला.

    2. कपिल सिब्बल यांचा 10 व्या सूचीवर युक्तिवाद.

    3. विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांचं ठाकरे गटाला समर्थन.

    4. विधान परिदेतील 12 आमदार, राज्यसभेतील 3 आणि लोकसभेतील 6 खासदारांचं समर्थन.

    5. पक्षसंघटनेत आम्हाला बहुमत असतानाही निवडणूक आयोगाचा त्यांच्या बाजूने निर्णय.

  • 21 Feb 2023 02:57 PM (IST)

    सोलापूर

    जमिनीवरुन दोघा भावांमध्ये वाद

    भावाला अद्दल घडवण्यासाठी पुतणीला संपवले

    पुतणीला ठार करून मृतदेह फेकला नदीत

    नात्याला काळिमा फासणारी घटना

  • 21 Feb 2023 02:52 PM (IST)

    खासदार संजय राऊत यांचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

    ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

    संजय राऊत यांनी पत्र ट्विट करीत दिली देवेंद्र फडणवीस यांना दिली माहिती

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांचा पत्रात दावा

    डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा ठाकुरला आपल्यावर हल्ला करण्याची दिली जबाबदारी

    संजय राऊत यांचा पत्रात दावा, मुंबई आयुक्तांनाही दिलं पत्र

    आपण लोकप्रतिनिधी असून अलीकडेच राज्य सरकारने आपलं पोलीस संरक्षण काढल्याचा निर्णयाकडेही संजय राऊत यांनी पत्रात वेधलं लक्ष

  • 21 Feb 2023 02:44 PM (IST)

    मुळशीतील सुजानील केमो कंपनीला आग

    जीवीतहानी नाही, कंपनीसह शेजारील शाळेचे नुकसान

    अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल

    पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील सुजानील केमो कंपनीला आग

  • 21 Feb 2023 02:01 PM (IST)

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन खेळाड़ू घाबरुन भारतातून पळ काढतायत ? ‘हा’ खेळाडू कॅप्टनशिपसाठी स्टँडबायवर

    IND vs AUS Test : म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडू पळ काढतायत असं म्हणण्याची वेळ आलीय. वाचा सविस्तर….

  • 21 Feb 2023 01:31 PM (IST)

    राहुल नार्वेकरांच्या निवडीवर जोरदार युक्तिवाद

    विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची- सिब्बल

    नार्वेकरांच्या निवडीत शिंदे गटाने व्हीपचं उल्लंघन केलं- सिब्बल

    राहुल नार्वेकरांनी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा- सिब्बल

    शिंदे गटाला वगळलं तरी नार्वेकर बहुमतात निवडून आले- कौल

    नार्वेकर बहुमतात निवडून आले, त्यावर युक्तिवाद नको- सरन्यायाधीश

    10व्या सूचीत बहुमताच्या आकड्यांचा उल्लेख नाही- सिब्बल

    नार्वेकरांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडलं- सिब्बल

    कोर्टाचे आदेश हे अध्यक्षांना बांधिल नसणं हा घटनात्मक पेच- सिब्बल

    शिंदे गटाला वगळलं तर बहुमताच्या 123ऐवजी 122 मतं- सिब्बल

    अपात्रतेचे अधिकार फक्त अध्यक्षांनाच- घटनापीठ

  • 21 Feb 2023 01:20 PM (IST)

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा एक मोठा प्लेयर टेस्ट सीरीजमधून बाहेर पण बदला घेण्यासाठी पुन्हा येणार

    IND vs AUS Test : एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू टेस्ट सीरीजमध्ये खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाच मोठं नुकसान होईल. वाचा सविस्तर…..

  • 21 Feb 2023 01:20 PM (IST)

    राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू

    राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस सुरू राहाणार

    १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात युक्तीवाद होणार

    ठाकरे गटाच्या याचिकेवर कोर्ट काय निर्णय घेणार?

  • 21 Feb 2023 01:17 PM (IST)

    मोबाईल रिचार्ज साठी नांदेडमधील एका दिव्यांगाचा थेट आमदार बच्चू कडू यांना फोन

    मोबाईल रिचार्ज साठी नांदेडमधील एका दिव्यांगाचा थेट आमदार बच्चू कडू यांना फोन

    नांदेड जिल्ह्यातील मोसखेळ गावच्या दिव्यांग ओंकार चव्हाणने केला बच्चू यांना फोन

    दिव्यांग व्यक्तीच्या फोन नंतर बच्चू कडू यांनी दिले मोबाईल रिचार्ज मारून

  • 21 Feb 2023 01:17 PM (IST)

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे प्रश्न

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे प्रश्न

    आम्ही नेतृत्वाला मानत नाही, असं फुटीर गट म्हणू शकतो का?-सिब्बल

    ‘एकाच चिन्हावर निवडून आलेले लोक वेगळे निर्णय कसे घेऊ शकतात?’

    ‘वाट्टेल ते आम्ही करु, असं म्हणायचा त्यांना अधिकार आहे का?’

    प्रकरण घटनापीठाकडे असताना आयोग कसं निर्णय देऊ शकतं-सिब्बल

    विधिमंडळातली पक्षाची फूट ही पार्टीची फूट मानायची का?-सिब्बल

    अशा प्रकरणात आयोगाची भूमिका कशी असावी, हा प्रश्न- सिब्बल

  • 21 Feb 2023 01:15 PM (IST)

    नांदेड : अपघातात पोलीस ठार

    आसना नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

    मनोहर पोवळे हे मृतक परभणीतील पोलीस विभागात होते

    अतिरक्तस्त्राव झाल्याने घटनास्थळीच मृत्यू

    घातपात असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा संशय

  • 21 Feb 2023 12:52 PM (IST)

    अध्यक्षांची निवड चुकीची असेल, तर त्यांना अधिकार नाही

    अध्यक्षांची निवड चुकीची असेल, तर त्यांना अधिकार नाही. अध्यक्षांची निवड चुकीची असेल, तर मुख्यमंत्र्यांची निवडही चुकीची आहे – कपिल सिब्बल

  • 21 Feb 2023 12:49 PM (IST)

    Entertainment Update : अमरीश पुरी यांच्या निधनानंतर Gadar 2 मध्ये सनी देओल याच्यासोबत कोण भांडणार?

    अभिनेता सनी देओल स्टारर Gadar: Ek Prem Katha सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

    सिनेमात अमरीश पुरी यांची भूमिका कोण साकारणार? पाहा सिनेमात कोण दिसणार खलनायकाच्या भूमिकेत?… वाचा सविस्तर

  • 21 Feb 2023 12:49 PM (IST)

    10 व्या सूचीचे अधिकार फक्त अध्यक्षांना

    10 व्या सूचीचे अधिकार फक्त अध्यक्षांना, कोर्टाला नाही. अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे – कोर्ट

  • 21 Feb 2023 12:49 PM (IST)

    अध्यक्षांना दहाव्या सूचीचे अधिकार

    अध्यक्षांच्या अधिकारात न्यायालयात आव्हान देता येत नाही

    विधानसभेच्या कामकाजात न्यायालयाचे हस्तक्षेप नाही- कोर्ट

    अध्यक्षांच्या अपात्रतेच्या निर्णयावर चर्चा होणार नाही

    कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे महत्वाचे- कोर्ट

  • 21 Feb 2023 12:41 PM (IST)

    अध्यक्षांना एक मत कमी पडले- सिब्बल यांचा दावा

    सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा

    राहुल नार्वेकर यांना १२२ मते मिळाली, १२३ मते हवी होती- सिब्बल

    अध्यक्ष निवडीवर चर्चा नको, ही निवड बहुमताने झाली-  सरन्यायाधीश

  • 21 Feb 2023 12:33 PM (IST)

    सिब्बल यांच्या युक्तीवादाला शिंदे गटाकडून उत्तर

    सिब्बल यांच्या युक्तीवादाला शिंदे गटाकडून उत्तर

    विधासभा अध्यक्षाच्या निवडीसंदर्भात सिब्बल यांचा मुद्दा होता

    नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी दिले उत्तर

    राहुल नार्वेकर यांची निवड बहुमताने

    राहुल नार्वेकरांच्या निवडीवरुन घटनापीठात चर्चा

  • 21 Feb 2023 12:24 PM (IST)

    समता पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील निवासस्थानी समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ व त्यांचे इतर सदस्य दाखल

    समता पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    मशाल चिन्ह बाबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांची माहिती

  • 21 Feb 2023 12:19 PM (IST)

    शिदेंवरील कारवाई प्रलंबित, मग मुख्यमंत्री कसे

    एकनाथ शिंदे यांच्यांवरील कारवाई प्रलंबित आहे, त्यानंतरही राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कशी दिली

    राज्यपालांच्या अधिकारावर  सिब्बल यांच्यांकडून प्रश्नचिन्ह

    शिंदे यांच्या सांगण्यावरुन पक्षाची एकही बैठक नाही

    विधानसभा अध्यक्षांची निवडही बेकायदेशीर

  • 21 Feb 2023 12:17 PM (IST)

    चेंबूरमध्ये लाइव्ह कॉन्सर्टनंतर सोनू निगमला धक्काबुक्की प्रकरण

    स्वप्निल फातर्पेकर यांच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर

    “माझ्या भावाला सोनू निगमसोबत सेल्फी क्लिक करायचा होता”

    “सेल्फी क्लिक करताना त्याचा सोनू निगमच्या बॉडीगार्डशी वाद झाला”

    “ती फक्त फॅन मूमेंट होती, ज्यावरून वाद झाला”

    “आम्ही नंतर सोनू निगमचीही मागितली माफी”

    सुप्रदा फातर्पेकर यांची प्रतिक्रिया

  • 21 Feb 2023 12:16 PM (IST)

    आसाममध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले?

    कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तीवाद

    आसाममध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले?

    राज्यपालांच्या निर्णयावर कोर्ट विचार करु शकतं

    शिंदेंनी 3 राज्यांची मदत घेतली.

    राज्यपालांचा हेतू माहित असल्यानेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.

  • 21 Feb 2023 12:14 PM (IST)

    समता पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांच्या भेटीला

    समता पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांच्या भेटीला

    मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील निवासस्थानी समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ व त्यांचे इतर सदस्य दाखल

    मशाल चिन्ह बाबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांची माहिती

  • 21 Feb 2023 11:53 AM (IST)

    युक्तीवादासाठी सिब्बल यांना हवे तीन दिवस

    आपणास युक्तीवादासाठी तीन दिवस लागणार- सिब्बल

    तुमचा युक्तीवाद आजच संपवा- सरन्यायाधीश

    सिब्बल यांच्यांकडून शिवसेनेच्या घटनेचे वाचन

    अपात्र आमदारांना राज्यपाल शपथ देऊ शकता का- सिब्बल

    राज्यपालांकडून अधिकारांचे उल्लंघन- सिब्बल

    अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना चिन्हाचा निर्णय कसा

  • 21 Feb 2023 11:49 AM (IST)

    Prithvi Shaw Controversy : पृथ्वीच्या अडचणी वाढणार, कोठडीत असलेल्या सपना गिलकडून मोठा आरोप

    Prithvi Shaw Controversy : सपना गिलने पृथ्वी शॉ वर एक नवीन गंभीर आरोप केलाय. वाचा सविस्तर….

  • 21 Feb 2023 11:45 AM (IST)

    अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात

    एसटी आणि ट्रकच्या अपघातात एसटीमधील 20 प्रवासी किरकोळ जखमी

    अमरावतीवरून 25 किलोमीटर पिंपळझिरा येथे अपघात

    नागपूरवरून अकोटला जाणाऱ्या एसटीची ट्रकला धडक

    ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने अपघात

    जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू

  • 21 Feb 2023 11:38 AM (IST)

    आयोगाने या प्रकरणात पुढे जायला नको होतं का?

    प्रकरण घटनापीठापुढे असताना आयोगाने का निर्णय दिला? सिब्बल यांचा सवाल

    आयोगाने या प्रकरणात पुढे जायला नको होतं का?  सरन्यायाधीश यांचा सवाल

    सिब्बल विविध प्रश्न उपस्थित करत युक्तीवाद करत आहेत

    तुमचे प्रमुख मुद्दे आम्हाला सांगा – कोर्ट

    आतापर्यंत सहा मुद्यातून पाच प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केले

  • 21 Feb 2023 11:38 AM (IST)

    सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

    नवी दिल्ली : विधिमंडळ पक्षातील फुट ही पार्टीची फुट मांडायची का ? असा युक्तिवाद कपिल सिब्बल करत आहे,

    खंडपीठासमोर प्रकरण असतांना निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायला नको होता – कपिल सिब्बल,

    आयोगाने या प्रकरणात पुढे जायला नको होतं का ? सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सवाल विचारला,

    विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत कपिल सिब्बल युक्तिवाद केला आहे.

  • 21 Feb 2023 11:29 AM (IST)

    दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’

    दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’

    सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘द काश्मीर फाइल्स’

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर’ बाल्की, ‘चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’

    सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर कपूर, ‘ब्रह्मास्त्र: भाग १’

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट

    मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर : ‘कंतारा’ साठी ऋषभ शेट्टी

  • 21 Feb 2023 11:23 AM (IST)

    ठाकरे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात

    ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला सुरुवात

    शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर या गोष्टी घडल्या- सिब्बल

    आम्ही नेतृत्वाला मानत नाही? असे फुटीर गट म्हणू शकतो का?

    एकाच चिन्हावर निवडून आलेले लोक वेगळे निर्णय घेऊ शकता का?

  • 21 Feb 2023 11:21 AM (IST)

    अहमदनगर: कर्जत येथे रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत 2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बैलगाडी शर्यत

    कर्जत येथे रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत 2 थरार सुरवात

    बैलगाडी थरार पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार

  • 21 Feb 2023 11:06 AM (IST)

    आता सर्वोच्च न्यायालय हाच आशेचा शेवटचा किरण- संजय राऊत

    या देशात सर्व संस्थांनी काम करणं बंद केलंय

    लोकशाहीची हत्या झाली आहे

    आता सर्वोच्च न्यायालयाकडेच एकमेव आशा आहे

    आम्ही तिथे न्याय मिळवू

    निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • 21 Feb 2023 11:03 AM (IST)

    Smriti Mandhana चा चाहत्यांना संदेश देताना, एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न

    स्मृती मांधनाने काल आयरिश बॉलर्सची वाट लावून टाकली. वाचा सविस्तर….

  • 21 Feb 2023 10:17 AM (IST)

    स्वस्तात सोने चांदी खरेदीची संधी

    विक्रमी भावापेक्षा सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

    चांदी ही किलोमागे 12 हजारांपेक्षा जास्त स्वस्त

    दोन दिवसांत सोने-चांदीचा भाव वाढले, बातमी एका क्लिकवर..

  • 21 Feb 2023 10:10 AM (IST)

    थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाबाबत सुनावणी

    नवी दिल्ली : ठाकरे गटाचे वकील आक्रमक होण्याची शक्यता,

    मूळ सत्ता संघर्ष बाजूला ठेवून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी, ठाकरे गट करणार

    निवडणूक आयोगा विरोधातली याचिका ठाकरे गटासाठी महत्त्वाची,

    घटनापिठासमोर ठाकरे गटाचे वकील आजच सुनावणी होऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत जोरदार युक्तिवाद करणार.

  • 21 Feb 2023 10:05 AM (IST)

    National News Live | ईडीकडून देशभरातील 24 ठिकाणी छापेमारी सुरू

    झारखंड सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातील अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित असलेल्या रांचीतही छापे

  • 21 Feb 2023 10:05 AM (IST)

    रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांचा कन्नड शहरात भव्य मोर्चा

    रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांचा कन्नड शहरात भव्य मोर्चा

    शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावरून काढणार भव्य शेतकरी मोर्चा

    पीकविमा, कर्जमाफी, अतिवृष्टी अनुदान यासाठी काढणार भव्य मोर्चा

    पिशोर नाक्यावरून कन्नड तहसील कार्यालयावर जाणार मोर्चा

    मोर्चात तब्बल 10 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याचा अंदाज

    संजना जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात

    कन्नड विधानसभा निवडणुकीसाठी संजना जाधव यांची मोर्चेबांधणी सुरू

  • 21 Feb 2023 10:04 AM (IST)

    राज्यसभेचे सभापती धनकर यांनी विरोधी पक्षाच्या 12 खासदारांविरुद्ध बजावली नोटीस

    विशेषाधिकार भंगाची बजावली नोटीस

  • 21 Feb 2023 10:00 AM (IST)

    ड्रम्समध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

    इंजिन गरम झाल्यामुळे लागली लाग

    मुंबई महामार्गावरील बीरमगुडा रोडवर झाला अपघात

    ट्रकच्या शेजारी असलेल्या कारलाही लागली आग

    सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

  • 21 Feb 2023 09:54 AM (IST)

    नवरीमुलीने वॉशरुममध्ये जाण्यासाठी नवऱ्या मुलाकडे 10 रुपये मागितले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक

    समाजात अशी पण माणसं असतात का? हा प्रश्न पडतो. वाचा सविस्तर….

  • 21 Feb 2023 09:53 AM (IST)

    IND vs AUS Test : Rohit Sharma केएल राहुलला टीममध्ये ठेवून त्याचा पत्ता करणार कट

    IND vs AUS Test : रोहित शर्माने तिसऱ्या टेस्ट मॅचआधी एक निर्णय घेतलाय. त्यावरुन बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात. वाचा सविस्तर….

  • 21 Feb 2023 09:38 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला

    भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवसभर शहरात तळ ठोकून

    महाविकास आघाडी साठी अजित पवार आदित्य ठाकरे यांचा सायंकाळी रोड शो

    येत्या 24 तारखेपर्यंत शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा

  • 21 Feb 2023 09:30 AM (IST)

    जगभरातील स्मार्टफोनमध्ये इंडियन चिप

    लवकरच मेक इन इंडियाचा डंका

    या दोन कंपन्यांच्या संयुक्त प्रकल्पातून चिप तयार होणार

    सेमीकंडक्टरच्या तुटवड्यावर भारताचा रामबाण उपाय

    हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर पळविल्याचा विरोधकांनी केला होता आरोप

    या लिंकवर वाचा बातमी : ‘इंडियन चिप’वर चालणार जगभरातील स्मार्टफोन! मेक इन इंडियाचा नारा, पहिला सेमीकंडक्टर प्लँट या शहरात

  • 21 Feb 2023 09:13 AM (IST)

    फेब्रुवारी महिन्यातच उत्तर भारतात उन्हाळ्याची चाहूल

    फेब्रुवारी महिन्यातच उत्तर भारतात उन्हाळ्याची चाहूल

    दक्षिण दिल्लीतल्या सफदरजंग विमानतळ परिसरात काल 33 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

    गेल्या 55 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील रेकॉर्ड तुटले

    उत्तर भारतातून लवकरच थंडी जाण्याची शक्यता

    संपूर्ण देशात यंदाचा उन्हाळा तीव्र असणार, हवामान खात्याचा अंदाज

  • 21 Feb 2023 09:00 AM (IST)

    इगतपुरी

    बलात्कार करून तरुणीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकार उघड

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घटना

    इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरातील अडसरे बुद्रुक येथे दोन दिवसापूर्वी मिळून आला होता तरुणीचा मृतदेह

    अत्याचार करून तरुणीची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न

    तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे का याबाबत देखील पोलीस करत आहेत अधिक तपास

    घोटी पोलिसांनी केली एका संशयितास अटक

    घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घोटी पोलीस करत आहेत अधिक तपास

  • 21 Feb 2023 08:55 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच पत्र एमपीएससी आयोगाला पोहोचलं नाही

    पुणे : राज्याचे सचिव नितीन गद्रे यांनी मुख्यमंत्र्यांच पत्रच पाठवलं नाही अशी माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली,

    काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंचा गंभीर आरोप,

    मुख्यमंत्र्यांचा आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी,

    आयोग मुख्यमंत्र्यांच्यावर आहे का ?

    विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा.

  • 21 Feb 2023 08:39 AM (IST)

    एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात मोठी दरवाढ नाही

    केंद्रीय अर्थमंत्र्यांचे इंधनावरील कर कपातीचे संकेत

    लवकरत इंधनावरील कराचा बोजा घसरणार

    महागाई कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

    पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा होऊ शकतो निर्णय,  वाचा बातमी 

  • 21 Feb 2023 08:32 AM (IST)

    IND vs IRE : 1 नाही 3 जबरदस्त कॅच, मॅच टीम इंडिया जिंकली पण मन आयरिश फिल्डर्सनी जिंकल, VIDEO

    VIDEO: आयर्लंडच्या महिला खेळाडूंची फिल्डिंग पाहून तुमच्या तोंडूनही कौतुकाचे शब्द बाहेर पडतील. वाचा सविस्तर…

  • 21 Feb 2023 08:31 AM (IST)

    India vs Ireland : भारताच्या आयर्लंडवरील विजयामुळे पाकिस्तानच स्वप्न मोडलं, जाणून घ्या कसं

    हरमनप्रीत कौरच्या टीमने T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला दिला दुसरा झटका. वाचा सविस्तर….

  • 21 Feb 2023 08:12 AM (IST)

    नागपूर शहरातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    बदल्यांमध्ये काही वादग्रस्त ठाणेदारांचा समावेश

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं झाल्या बदल्या

    सदर पोलीस स्टेशनचे पीआय विनोद चौधरी यांची वाहतूक शाखेत बदली

    सोनेगाव पोलीस स्टेशनचे पीआय डी डी सागर यांची गुन्हे शाखेत बदली

  • 21 Feb 2023 08:10 AM (IST)

    नागपुरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश

    नागपुरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश

    वाहतूक कोंडी सोडवा आणि फुटपाथ मोकळे करा

    उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महानगरपालिका आयुक्तांना आदेश

    या कारवाईचा अहवाल एक मार्चपर्यंत न्यायालयात सादर करण्याच्या सूचना

    शहरातील अतिक्रमण, अवैध पार्किंग संदर्भात जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान आदेश

    वाहतुकीला खोळंबा ठरणारे रस्त्यावरील खांब एक मार्चपर्यंत हटवण्याचे आदेश

  • 21 Feb 2023 08:08 AM (IST)

    राज्य सरकारविरोधात आज आ. बच्चू कडू यांचं आंदोलन

    शेतकऱ्यांच्या जमिनीचा आज ‘नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ॲापरेटीव्ह बॅंक’ लिलाव करणार असल्याने बच्चू कडू आक्रमक

    नागपूर जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव

    आज होणारा शेतजमिनीचा लिलाव उधळण्याचा माजी राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांचा इशारा

    लिलाव उधळण्याबाबत बच्चू कडू यांचं नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

    ‘शेतजमिनीचे लिलाल हाणून पाडणार, बँक मॅनेजरला धडा शिकवणार

  • 21 Feb 2023 08:08 AM (IST)

    तिरुपती बालाजीच्या भक्तांना आता निवासासाठी 12 टक्के जीएसटीचा बोजा पडणार

    – तिरुपती बालाजीच्या भक्तांना आता निवासासाठी 12 टक्के जीएसटीचा बोजा पडणार आहे

    – तिरुपती देवस्थान कडून ऑनलाईन निवासाच्या बुकिंगसाठी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणारेय

    – यापूर्वी निवासासाठी ऑनलाइन बुकिंग वर कोणताही कर आकारला जात नव्हता

    – देवस्थानकडून निवासाच्या ऑनलाइन बुकिंग साठी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे

    – त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या भक्तांच्या खिशावर बोजा पडणार आहे

  • 21 Feb 2023 08:07 AM (IST)

    सेल्फी काढल्याच्या रागातून आईसह मुलीला मारहाण..

    सेल्फी काढल्याच्या रागातून आईसह मुलीला मारहाण..

    डोंबिवली पिंपळेश्वर महादेव मंदिरात घडली घटना

    रस्त्यावरील दगड उचलून महिलेच्या डोक्यात मारल्याने महिला गंभीर जखमी

    मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 21 Feb 2023 07:56 AM (IST)

    मनपाच्या ‘ढोल बजाओ’ मोहिमेसाठी आयुक्तांच्या आदेशाची प्रतिक्षा

    मनपाच्या ‘ढोल बजाओ’ मोहिमेसाठी आयुक्तांच्या आदेशाची प्रतिक्षा

    कर वसुली विभागाने दिला पुन्हा एकदा ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू करण्याचा प्रस्ताव

    मार्च महिन्यात पुन्हा मोहीम सुरू करण्याचा विचार

    थकीत कर वसुलीत मोठा हातभार लागण्याचा अंदाज

  • 21 Feb 2023 07:53 AM (IST)

    चिंचवडमध्ये प्रकाश आंबेडकर मविआचं टेन्शन वाढवणार

    चिंचवडमध्ये प्रकाश आंबेडकर मविआचं टेन्शन वाढवणार

    22 तारखेला उद्या प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा

    चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार

    रावेत डी मार्टजवळ सभा होणार

    वंचितनं राहुल कलाटेंना पाठिंबा दिलाय

Published On - Feb 21,2023 7:43 AM

Follow us
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.