विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध?, 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध
विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत. पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत. पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरला आहे. अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने अर्ज बाद झाला.
दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके बिनविरोध. 20 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. अशात, 20 तारखेनंतर बिनविरोध संदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी करणार आहेत.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 1 तर अपक्षाने 1 अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने अर्ज बाद झाला. दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके यांची बिनविरोध निवड होण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.संदीप जोशी हे नागपूरमधून असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधील असून त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे 2026 पर्यंत आहे. राष्ट्रवादीचे खोडके यांची मुदत 2030 पर्यंत तर शिवसेनेचे रघुवंशी यांची मुदत 2028 पर्यंत आहे.