Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update : राज्यात मृत्यूचं तांडव! दिवसभरात 349 जणांचा मृत्यू, तर 61 हजार 695 नवे रुग्ण

आज दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात मृत्यूचं तांडव! दिवसभरात 349 जणांचा मृत्यू, तर 61 हजार 695 नवे रुग्ण
कोरोना चाचणी प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 9:38 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. आज कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येसह मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. (number of deaths due to corona is alarming, 349 people died today)

आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 59 हजार 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मृत्यांचा आकडा 59 हजार 153 वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत आज दिवसभरात 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 10 हजार 97 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्याही चिंताजनक बनली आहे. दिवसभरात मुंबईत 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान मुंबई जिल्ह्यातील कोविड वाढीचा दर 1.64 टक्क्यांवर आला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 395 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. दिवसभरात एकूण 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यातील 43 मृत्यू हे एकट्या ससून रुग्णालयात झाले आहेत. तर पुण्यात दिवसभरात 4 हजार 321 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात सध्या 54 हजार 351 जणांवर उपचार सुरु आहेत.

आजच्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 49 हजार 424 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 89 हजार 122 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 951 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात गेल्या 24 तासांत 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 4 हजार 634 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 99 हजार 849 वर पोहोचलीय. त्यातील 2 लाख 32 हजार 705 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील मृत्यूच्या संख्येनं आता 6 हजारांचा आकडा पार केलाय. नागपुरातील एकूण मृतांची संख्या 6 हजार 34 वर जाऊन पोहोचली आहे.

संबंधित बातम्या : 

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

Maharashtra Sanchar Bandi : आता सर्वसामान्यांचं पेट्रोल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली

number of deaths due to corona is alarming, 349 people died today

शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.