Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची लॉकडाऊनमध्ये घोडदौड, नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. | lockdown imposed in parbhani

Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची लॉकडाऊनमध्ये घोडदौड, नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन
lockdown
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 3:45 PM

परभणी: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे परभणीत स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन (Lokcdown) जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे 13 आणि 14 मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. आज मध्यरात्रीपासून सुरु झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल. (Total Lockdown in Parbhani district Maharashtra)

परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. यापूर्वी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Lockdown in Nagpur) करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली होती. मात्र, या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे आता नागपुरात लॉकडाऊनच्या मुद्दयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पुण्यात रात्रीची संचारबंदी, शाळा 31 मार्चपर्यंत बंद, काय सुरु, काय बंद?

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.

तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.

पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.

खासगी आस्थापने रात्री दहा वाजेपर्यंत तर उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार,कॅफे, डायनिंग हॉल अशा ठिकाणच्या सेवा 50 टक्के क्षमतेसह रात्री 11वाजेपर्यंत आणि मॉल्सहीत सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 वाजेपर्यत सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या:

Nagpur Lockdown: 15 मार्चपासून कडक निर्बंध, मात्र नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध

(Total Lockdown in Parbhani district Maharashtra)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.