Maharashtra Lockdown : राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या

सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलीय.

Maharashtra Lockdown : राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 4:09 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा बुधवारी करण्यात आलीय. राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत एक परिपत्रक काढून गुरुवारी म्हणजे आज रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यासाठी कठोर नियमावलीही तयार करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलीय. (State Government new guidelines for ST Travel)

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एसटी नियमावली

>> एसटी बस मधून फक्त आपत्कालीन कर्मचारी प्रवास करणार >> एसटी महामंडळाच्या 16 हजार गाड्यांपैकी स्थानिक पातळीवरील डेपो मॅनेजर निर्णय घेऊन 50% गाड्या रस्त्यावर उतरणार >> डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी  यांनाच त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट देण्यात येईल. >> कोणतीही व्यक्ती  ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, किंवा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती प्रवास करता येईल

खासगी प्रवासी वाहतूक

अ) बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल आणि त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

ब) खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील पण उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घ्यायला परवानगी नाही.

आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासासाठी खासगी बसगाड्यांसाठी नियंत्रणे

1.  बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.

2.  सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.

3. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown Update : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 1 मेपर्यंत कडक निर्बंध; सर्व नियमावली एका क्लिकवर

VIDEO | अहमदनगरमध्ये तहसीलदार ज्योती देवरेंकडून कोरोनाबाधित वृद्धावर अंत्यसंस्कार

State Government new guidelines for ST Travel

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.