Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या, चंद्रकांत पाटलांची दर्यादिली

भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा अशी भूमिका भाजपनं मांडली आहे.

Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या, चंद्रकांत पाटलांची दर्यादिली
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 7:02 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बनत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलीय. त्यावर भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा अशी भूमिका भाजपनं मांडली आहे. (Reduce MLA funds and give the money to the workers- Chandrakant Patil)

‘आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना मदत द्या’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

‘निर्बंध हवे, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्या’

कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

जनतेला मानसिक दिलासा देण्याची गरज- दरेकर

राज्यातील जनतेला सध्या मानसिक दिलासा देण्याची गरज आहे. राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वय आवश्यक आहे. एकमेकांची उणीदुणी निघत असतात पण आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ, असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये एकमत नाही. मुंबईत नाना पटोले यांचे लॉकडाऊन विरोधातील पोस्टर्स लावले जात आहे. तर इथे बाळासाहेब थोरात कडक आणि कटू निर्णय घ्यावे लागतील असं सांगत आहे, असंही दरेकर म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय घ्यायचा असेल तर आधी उद्योग, व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करा, अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी आग्रही, काँग्रेसची भूमिका काय?

रेमडेसीव्हिरची निर्यात थांबवा, पुढील महिन्यात एक लाख डोसची गरज: राजेश टोपे

Reduce MLA funds and give the money to the workers- Chandrakant Patil

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.