Beed Lockdown : बीड जिल्ह्यात तीन दिवस कडक लॉकडाऊन, काय सुरु? काय बंद?

बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 3 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तसे आदेश जारी केले आहेत.

Beed Lockdown : बीड जिल्ह्यात तीन दिवस कडक लॉकडाऊन, काय सुरु? काय बंद?
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 7:21 PM

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशा स्थितीतही काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अजून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय काही जिल्हा प्रशासनांनी घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 3 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तसे आदेश जारी केले आहेत. अनेक वेळा सूचना देऊनही नागरिक सहकार्य करत नाहीत. त्यामुळे बुधवार ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. (Three days strict lockdown in Beed district)

रुग्णालये आणि मेडिकल वगळून सर्व दुकाने बंद

बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालीय. राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून पुढील तीन दिवस रुग्णालये आणि मेडिकल वगळता एकही दुकान सुरु असणार नाही. त्यामुळे गरजेच्या सामानाची खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येतेय. त्याचबरोबर बंदी आदेश लागू असूनही बीड जिल्ह्यात काही ठिकाणी कापड, तसंच अन्य काही दुकानं सुरु होती. या दुकानांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलीय.

जिल्ह्यात लॉकडाऊन वाढण्याची कारणे –

>> बीड जिल्ह्यामध्ये दिवसाला 28 ते 30 रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांचं प्रमाण कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

>> बाजारपेठेमध्ये वेळोवेळी सूचना करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे आणि सूचनांचे पालन करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

>> जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची तारांबळ कमी व्हावी. तसंच ज्यांना उपचाराची खरी गरज आहेत त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय.

>> गेल्या महिनाभरात प्रत्येक दिवशी हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

>> बीडसह अन्य शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र, आता गावखेड्यांमध्येही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा पुरवठा 10 दिवसांत सुरळीत होणार, वडेट्टीवारांचा दावा

सांगलीत आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; जयंत पाटील म्हणाले, सर्वांचाच जीव महत्त्वाचा

Three days strict lockdown in Beed district

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.