फडणवीसांची घोषणा, ठाकरेंकडून अंमलबजावणी, 70 हजार रिक्त जागा भरणार
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या 70 हजार रिक्त पदांची भरती (Maharashtra MahaBharti) करण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या 70 हजार रिक्त पदांची भरती (Maharashtra MahaBharti) करण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. विविध विभागांतील 70 हजार रिक्त पदे भरण्यात येणार (Maharashtra MahaBharti) आहेत. ठाकरे सरकारची काल मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये या रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा झाली.
ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. त्यामुळे तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. त्यानुसार आता ठाकरे सरकार ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 मध्ये विविध विभागात 72 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 2018 मध्ये 36 हजार आणि 2019 मध्ये 36 हजार पदं भरली जाणार होती. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाईल असं त्यावेळी घोषित करण्यात आलं होतं. मात्र, लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती प्रक्रिया थांबली होती.
कोणत्या विभागात किती जागांची भरती?
- ग्रामविकास : 11000
- गृह विभाग : 7111
- कृषी विभाग : 2500
- पशु व दुग्ध संवर्धन विभाग : 1047
- सार्वजनिक बांधकाम : 8330
- जलसंपदा : 8220
- जलसंधारण 2433
- नगरविकास : 1500
- आरोग्य : 10,560
संबंधित बातम्या
अखेर प्रतीक्षा संपली, पुढच्या आठवड्यात मेगाभरतीची जाहिरात
मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही : हायकोर्ट
शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला, जानेवारीपासून भरती सुरु
गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील कोण?
दादा म्हणाले, 50 टक्के केस संपली, मराठा आरक्षणाचं गुपित फोडलं!