राज्यभरात दमदार पाऊस, औरंगाबादमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, संगमनेरचा तामकडा धबधबा कोसळला
राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. औरंगाबादमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली (Maharashtra Mansoon Rain latest Updates).
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. औरंगाबादमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली (Maharashtra Mansoon Rain latest Updates). त्यामुळे तेथे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई उपनगरातही काहीवेळ पावसाने हजेर लावली. राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी धबधबेही सुरु झाले आहेत. अशाचप्रकारे नाशिक-पुणे महामार्गावरील प्रसिद्ध तामकडा धबधबा सुरु झाल्याचं दिसत आहे. अनेक प्रवासी रस्त्यावर काही क्षण थांबून या धबधब्याचा आनंद घेत आहेत.
मुंबईतील जुहू परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आगामी 24 तासांमध्ये मुंबईत ढगाळ वातावरणासह अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची मात्र, चांगलीच भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर शहरात पावसाने हजेरी लावली. भुसावळ जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरीता महत्वाच्या अशा हतनूर धरणाचे चौदा दरवाजे सकाळी 6 वाजता अर्धा मीटरने उघडण्यात आले.
जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे चौदा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. धरणातून चौदा दरवाजातून 11867 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी खळाळून वाहू लागली आहे. सद्य:स्थितीत धरणाची जलपातळी 209.47 मीटर आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे औरंगाबादच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले. नागरिकांच्या थेट घरातही पाणी घुसल्याने अनेकांना पर्यायी निवारा शोधण्याची नामुष्की आली. औरंगाबादमधील अनेक रस्ते देखील जलमय झालेले पाहायला मिळाले. मात्र, घरात पाणी घुसूनही सरकारी यंत्रणांची मदत न मिळाल्याने औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावर ढिसाळपणाचा आरोप होत आहे.
अहमदनगर
#अहमदनगर | संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात असलेला प्रसिद्ध तामकडा धबधबा कोसळू लागला pic.twitter.com/F4QJb7Mdzr
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2020
अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. संगमनेर तालुक्यात मुसळधार पावसाने नाशिक-पुणे महामार्गावरील प्रसिद्ध तामकडा धबधबा प्रवाहित झाला आहे. रस्त्याने जाताना दिसणारा हा मनमोहक धबधब्याचा नजारा पाहण्यासाठी अनेक प्रवाशांचे पाय स्थिरावताना दिसत आहेत. अनेक प्रवासी क्षणभर विश्रांती घेत या धबधब्याचा आनंद घेत महामार्गावर थांबत आहेत.
नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात असलेलं हे नयनरम्य दृश्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. दरवर्षी जुलैच्या सुरुवातीला वाहणारा हा धबधबा यावर्षी शेवटच्या आठवड्यात प्रवाहित झाला. त्यामुळे महामार्गावरील प्रवासी क्षणभर थांबून निसर्गाचं हे रुप डोळ्यात भरुन घेत आहेत.
बीड
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे. वडवणी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणीपातळी 536.55 मी झाल्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या 20 सेमीने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिसरातील नद्या देखील तुडूंब भरुन वाहताना दिसत आहेत. पाण्याचा विसर्ग पाहता धरण आणि नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून तर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा 50 टक्के पाऊस जास्त झाला आहे.
जालना
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध येथून वाहणारी रायघोळ नदी देखील खळखळून वाहू लागली आहे. काल पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत मोठी वाढ झाली. मात्र शेलूद, मादणी, आमसरी, वाघेरा, जळकी, शिवणा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धामणा धरण 100 टक्के भरलं. यामुळे रायघोळ नदीला पाणी सुरु झालं आहे.
नदीकाठी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मागील 3 वर्षांपूर्वी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले असल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो होऊन रायघोळ नदीतून पाणी वाहत आहे. रायघोळ नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नदी परिसरातील विहिरींचा जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढलाय. रायघोळ नदीला आलेल्या पाण्यामुळे परिसरातील शेलूदसह पारध खुर्द, पारध बु., कुंबेफळ, टाकळी, म्हसला, सातगाव आदी गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
संबंधित व्हिडीओ :
हेही वाचा :
हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला
Sharad Pawar | शरद पवारांच्या दौऱ्यांचा धडाका, नाशिकमध्ये ‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेणार
पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनोखा उपक्रम
Maharashtra Mansoon Rain latest Updates