शिवजयंतीवरुन राष्ट्रवादीची मोठी भूमिका, धनंजय मुंडे म्हणाले, आधीच मुख्यमंत्र्यांना बोललो होतो!
Shiv Jayanti Guidelines 2021 : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारला घरचा आहेर मिळाला असंच म्हणावं लागेल.
औरंगाबाद : शिवजंयती उत्सवावर (Shiv Jayanti Guidelines 2021) निर्बंध घातल्यामुळे ठाकरे सरकार (Thackeray Sarkar) बॅकफूटवर गेलं आहे. त्यातच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारला घरचा आहेर मिळाला असंच म्हणावा लागेल. “जेव्हा पहिला जी आर काढला तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना बोललो होता. त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्री महोदयांना जीआर बदलवायला हवा असं सांगितलं होतं. निर्बंध घालण्याऐवजी मोकळेपणाने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमांचे पालन करुन व्हायला हवी”, असं धनंजय मुंडे म्हणाले. (Maharashtra minister Dhananjay Munde said i had already said to CM we have to change the GR related Shiv jayanti guidlince)
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्याबाबत निर्बंध घातले आहेत. मात्र त्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्या परिस्थितीत मोठ्या उत्साहात शिवजंयती साजरा करण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
ठाकरे सरकारने कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवजयंती उत्सवाबाबत राज्य सरकारचे निर्बंध काय?
मार्गदर्शक सूचना
1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड- 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
3. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
5. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,
6. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
भाजपचा आक्रमक पवित्रा
दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर हल्लाबोल केला. याशिवाय भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही शिवजयंती उत्साहात साजरा करण्याचा निर्णय केला आहे. तर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवजयंतीला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा निर्धार केला आहे.
संबंधित बातम्या:
सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी
शिवजयंतीचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी, वाचा कुठले नियम पाळावे लागतील?
मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली
Video: जेव्हा पडळकर-मिटकरी एकमेकांविरोधात ‘आरे तुरे’वर येतात, पाहा हमरीतुमरी Exclusive