VIDEO | पदर खोचला, हातात लाटणं घेऊन सरसर पोळ्याही लाटल्या, मंत्री यशोमती ठाकूर यांचा अनोखा अंदाज
यशोमती ठाकूर यांनी कामाच्या व्यापातून वेळ काढत ही संधी साधली आहे. (Yashomati Thakur Rolled Chapati in Amravati)
अमरावती : घरातील स्वयंपाक करणं हे महिलांचं रोजचं कामच आहे. पोळ्या करणं हा तसा प्रत्येक महिलेच्या दैनंदिन जीवनाचा भाग… पण राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनात या सर्व गोष्टींसाठी महिला राजकारण्यांना वेळ मिळत नाही. मात्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कामाच्या व्यापातून वेळ काढत ही संधी साधली आहे. (Yashomati Thakur Rolled Chapati in Amravati)
यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार येथे राहणाऱ्या संजय चौधरी यांनी जेवणासाठी आमंत्रण दिले होते. त्यांच्या आग्रहाखातर यशोमती ठाकूर त्या ठिकाणी जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे महिला मोठ्या प्रमाणात पोळ्या लाटत होत्या.
हे दृष्य पाहताच यशोमती ठाकूर यादेखील पदर खोचत महिलांसोबत पोळ्या लाटण्यास सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी त्या महिलांशी गप्पाही मारल्या. तसेच त्यांनी प्रथमच सामान्य महिलांप्रमाणे पोळ्या लाटण्याचा आनंद घेतला. अनेक दिवसांनी पोळ्या करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटला, असे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. (Yashomati Thakur Rolled Chapati in Amravati)
संबंधित बातम्या :
सर्व घरं गुलाबी, इमारती गुलाबी, महाराष्ट्रातील ‘पिंक व्हिलेज’ तुम्ही पाहिलंय का?
Iceland Volcano Eruption: 800 वर्षांपासून निद्रिस्त ज्वालामुखीचा स्फोट, आइसलँडमधील थरार पाहा!