Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : ‘या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत’, यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा

| Updated on: Jul 17, 2023 | 10:53 AM

Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live updates : भाजपा शिवसेना युतीसोबत अजित पवार आल्यानंतर कोणला कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून कोणाला कोणतं खातं मिळालं जाणून घ्या

Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : 'या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत', यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांना खात्याचं वाटप केलं आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jul 2023 10:12 PM (IST)

    Chandrayaan 3 LIVE : यशस्वी लाँचनंतर आता पुढे काय? कसा असेल चांद्रयान 3 प्रवास?

    Chandrayaan 3 Successful Launch | चंद्रावर जाण्याआधी चांद्रयान 3 ला अजून बऱ्याच अग्निपरिक्षा द्यावा लागणार, नेमकं काय घडणार? वाचा सविस्तर…..

  • 14 Jul 2023 10:09 PM (IST)

    Chandrayaan 3 LIVE : यशस्वी लाँचनंतर आता पुढे काय? कसा असेल चांद्रयान 3 प्रवास?

    Chandrayaan 3 Successful Launch | चंद्रावर जाण्याआधी चांद्रयान 3 ला अजून बऱ्याच अग्निपरिक्षा द्यावा लागणार, नेमकं काय घडणार? वाचा सविस्तर…..

  • 14 Jul 2023 07:49 PM (IST)

    ‘या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत’, यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा

    अमरावती : 

    काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असा मोठा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

    यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

    “खातेवाटपला खूप वेळ लागला.  अजित पवार यांनी अट्टहास करून चांगली खाती मिळवली.  या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, अस माझं मत आहे. एकनाथ शिंदे यांची गोची झालीय. एकनाथ शिंदे यांनी मविआची तोडमोड केली. महाविकास आघाडी काही वाईट होती का? मुख्यमंत्र्यांना जसं महत्त्व पाहिजे तसं महत्त्व एकनाथ शिंदे यांना मिळत नाही. ज्या काही वाटचाली सुरू आहेत त्यावरून मला वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दिसणार नाही. ही खिचडी सरकार कोणाच्या फायद्याची आणि नुकसानीची आ,हे हे मला कळत नाही. बच्चू कडू यांना कोणीही सिरियस घेत नाही”.

  • 14 Jul 2023 04:48 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : उदय सामंत यांच्यासह या मंत्र्यांना मिळाली अशी खाती

    • उदय सामंत- उद्योग
    • तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
    • रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
    • दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
    • धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन
    • अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
    • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
    • अदिती तटकरे – महिला व बालविकास
    • संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
    • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
    • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

  • 14 Jul 2023 04:45 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : सुरेश खाडे, संदीपान भुमरे यांच्याकडे या खात्यांची जबाबदारी

    सुरेश खाडे यांच्याकडे कामगार, तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

  • 14 Jul 2023 04:44 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : दादा बुसे, संजय राठेड यांच्याकडे कोणती जबाबदारी?

    दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), तर संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • 14 Jul 2023 04:42 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांकडे या खात्यांची जबाबदारी

    भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये  गिरीश महाजन यांच्याकडे ग्राम विकास आणि पंचायत राज आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय असणार आहे.

  • 14 Jul 2023 04:41 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय

    विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

  • 14 Jul 2023 04:39 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणतं खातं?

    चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.

  • 14 Jul 2023 04:38 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना फटका, कृषी खातं धनंजय मुंडेंकडे

    अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेलं कृषी खातं आता धनंजय मुंडेकडे आलं आहे. तर अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आलं आहे.

  • 14 Jul 2023 04:35 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : हसन मुश्रीफ यांच्याकडे कोणतं खातं?

    हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • 14 Jul 2023 04:34 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणतं खातं?

    सुधीर मुनगंटीवार यांंच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

  • 14 Jul 2023 04:33 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे कोणतं खातं?

    राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

  • 14 Jul 2023 04:31 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे कोणतं खातं?

    दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • 14 Jul 2023 04:30 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : छगन भुजबळ यांच्याकडे कोणतं खातं?

    छगन भुजबळ यांना  अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे.

  • 14 Jul 2023 04:29 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतं खातं?

    देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्याच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती आहेत.

  • 14 Jul 2023 04:26 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

  • 14 Jul 2023 04:23 PM (IST)

    Maharashtra MLA Portfolio Announcement 2023 live : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर अजित पवार यांना अर्थखातं मिळालं आहे.

Published On - Jul 14,2023 4:21 PM

Follow us
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.