नागपूर: नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. बेड नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात आहे. एका बेडवर कोरोनाच्या दोन रुग्णांवर सुरु उपचार आहे. गेल्या 10 दिवसांपासून मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मेडिकलच्या बाहेरही फुटपाथवर रुग्ण झोपले. नागपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून जिल्ह्यातील व्हेंटीलेटर्स बेड संपले आहेत. (Maharashtra Nagpur Corona Update Ventilators, oxygen bed full patient sleep on flour and taking treatment)
नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ताण आल्याचं चित्र आहे. नागपूरमधील मेडिकल रुग्णालयामध्ये रुग्णांना ट्रामा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये झोपवून उपचार करण्याची वेळ ओढावली आहे. तर एका बेडवर दोन दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. तर मेडिकल रुग्णालयाच्या बाहेर देखील रुग्ण झोपल्याचं चित्र आहे.
नागपूर जिल्ह्याचा देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप टेनमध्ये समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये गेल्या 10 दिवसांपासून क्षमेतपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे.
नागपूर मेडिकल कॅालेजच्या निवासी डॅाक्टरांनी रविवारी क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार करावे लागत असल्यानं धरणे आंदोलन केलं आहे. मेडिकल रुग्णालयामध्ये गेल्या 10 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने डॅाक्टरांनी धरणे आंदोलन केले. मेडिकलचे 40 निवासी डॅाक्टर धरणे आंदोलनाला बसले होते. डॅाक्टरांची अडचण प्रशासनाला कळावी म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले होते.
नागपूरची कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांवर
नागपूरमधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 2 लाख 84 हजार 258 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 लाख 21 हजार 387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 58 हजार 507 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 4 हजार 318 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच, व्यावहारिक भूमिका घ्या, हसन मुश्रीफ यांचं व्यापाऱ्यांना आवाहन https://t.co/DujpfxBfAw
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
संबंधित बातम्या:
स्मशनात जागा नाही, त्यात पुरलेले मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढले, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार
कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात
(Maharashtra Nagpur Corona Update Ventilators, oxygen bed full patient sleep on flour and taking treatment)