ड्रायव्हरची डुलकी जीवावर, गुरुभेटीला जाताना पुणेगावातील त्यागी महाराजांचा अपघाती मृत्यू

नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील त्यागी महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. उत्तराखंड येथील गुरुंच्या भेटीसाठी निघालेले असताना बिहारमध्ये हा भीषण अपघात झाला.

ड्रायव्हरची डुलकी जीवावर, गुरुभेटीला जाताना पुणेगावातील त्यागी महाराजांचा अपघाती मृत्यू
त्यागी महाराज
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 12:40 PM

नांदेड : नांदेड तालुक्यातील पुणेगाव (Punegaon Nanded) येथील त्यागी महाराज (Tyagi Maharaj) यांचा अपघाती मृत्यू झाला. उत्तराखंड येथील गुरुंच्या भेटीसाठी निघाले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. बिहारमध्ये त्यांच्या गाडीचा ट्रकसोबत अपघात (Car Accident) झाला होता. चालकाचा डोळा लागल्याने कारची ट्रकला पाठीमागून धडक बसल्याची माहिती आहे. त्यागी महाराज यांच्यासह अन्य एकाला कार अपघातात प्राण गमवावे लागले. तर कारमधील इतर पाच जण जखमी या अपघातात झाले आहेत. पुणेगाव येथील मठाचे योगी असलेल्या त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरात भक्त आहेत. त्यागी महाराज यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पुणेगाव वर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील त्यागी महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. उत्तराखंड येथील गुरुंच्या भेटीसाठी निघालेले असताना बिहारमध्ये हा भीषण अपघात झाला. यावेळी महाराजांसह अन्य एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.

कोण होते त्यागी महाराज?

पुणेगाव येथील मठाचे योगी त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरात भक्त आहेत. दरवर्षी ते पुणेगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्या निमित्त उत्तराखंड येथील गुरुंच्या भेटीसाठी ते दोन दिवसांपूर्वी पुणेगाव येथून कारने निघाले होते. चालकासह या कारमध्ये सात जण होते.

Bihar Car Accident Tyagi Maharaj 2

ड्रायव्हरला डोळा लागला आणि…

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार बिहार राज्यातील चाळीसगाव परिसरात आली असताना चालकाचा डोळा लागला. त्यामुळे कारची ट्रकला पाठीमागून धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की कार मधील योगी त्यागी महाराज आणि बळीराम विक्रम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला. तर आमदूरा आणि माळ कौठ येथील चार जण आणि चालक जखमी झाले आहेत. त्यागी महाराज यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पुणेगाववर शोककळा पसरली आहे. मठ परिसरात शिष्यांनी मोठी गर्दी जमली होती. संबंधित बातम्या :

दुभाजक तोडून BMW विरुद्ध दिशेला, ट्रकवर धडकून कार उलटली, गोंदियात भीषण अपघात

कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच

बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.