नाशिक : झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलीय. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ही समिती झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यांनी केलेल्या सूचना SOP म्हणून वापरल्या जातील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. (7 member high level inquiry committee to investigate Nashik oxygen leak tragedy)
नाशिकची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, असं टोपेंनी सांगितलं.
नाशिक येथील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयाला आज भेट दिली, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाहून अतिशय दुःख झाले. माझ्यासोबत महसूल मंत्री @bb_thorat जी व आरोग्य मंत्री @rajeshtope11 जी सुद्धा उपस्थित होते. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. pic.twitter.com/hYkawVg9K2
— Dr.Rajendra Shingne (@DrShingnespeaks) April 21, 2021
या दुर्घटनेनंतर आता ऑक्सिजन लिक्विड टँकमध्ये किती साठा आहे, किती प्रेशर आहे याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्याचबरोबर 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आणि स्वतंत्र मेंटेनन्ससाठी व्यक्ती नेमावा लागणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी SOP ठरवली जाईल. चौकशी समितीकडून मिळालेल्या सूचना SOP म्हूण लागू करु, असं टोपे यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख तर महापालिकेकडून 5 लाखाची मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं
नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुःखदायक असून त्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या सांत्वनाला शब्द अपुरे आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 21, 2021
संबंधित बातम्या :
7 member high level inquiry committee to investigate Nashik oxygen leak tragedy