गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्ते करण्यासाठी आणलेली 30 वाहने पेटवली

गडचिरोली :  गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली आहेत. रस्त्याचे काम सुरु असताना, नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठी दोनवेळा धमकी दिली होती. मात्र तरीही काम सुरुच राहिल्याने नक्षलवाद्यांनी वाहने पेटवून दिली. यामध्ये ट्रक ,ट्रॅकटर, जेसीबी, बोलेरो अशी जवळपास 30 वाहनांचा कोळसा झाला आहे. कुरखेडा तालुक्यात दादापूर इथं […]

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्ते करण्यासाठी आणलेली 30 वाहने पेटवली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली :  गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली आहेत. रस्त्याचे काम सुरु असताना, नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठी दोनवेळा धमकी दिली होती. मात्र तरीही काम सुरुच राहिल्याने नक्षलवाद्यांनी वाहने पेटवून दिली. यामध्ये ट्रक ,ट्रॅकटर, जेसीबी, बोलेरो अशी जवळपास 30 वाहनांचा कोळसा झाला आहे. कुरखेडा तालुक्यात दादापूर इथं ही घटना घडली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

कुरखेडा तालुक्यातील दादापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु होतं. त्यावेळी नक्षलवाद्यांनी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने जवळपास दहा ते 12 कोटी रुपयांची आहेत. 60 ते 70 नक्षलवादी रात्री एक वाजता घटनास्थळी आले आणि त्यांनी मजुरांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी वाहनांमधील डिझेल काढून ती वाहने पेटवून दिली. छत्तीसगड सीमा भागातून हे नक्षलवादी आल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी अनेक भुसुरुंग स्फोट घडवले होते. एका भुसुरुंग स्फोटात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले होते. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये 9 एप्रिलला ही घटना घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांनी सातत्याने आपले हल्ले चालूच ठेवले. निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली, छत्तीसगड परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. पण तरीही नक्षल्यांनी आपल्या कारवाई सुरुच ठेवल्या.

संबंधित बातम्या  

नक्षलवादी हल्ल्याने छत्तीसगड हादरलं, भाजप आमदारासह पाच जवानांचा मृत्यू  

खबऱ्यांना ठार करणार, नक्षलींचं पत्र, गडचिरोलीत 11 दिवसात 7 आदिवासींची हत्या   

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीतील नक्षलींचं पत्र टीव्ही 9 च्या हाती  

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.