मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्वाची लढाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी राजकीय धक्का दिला आहे. पक्ष संघटना आणि आमदार कोणासोबत आहेत? हे दाखवण्याचा दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरु आहे. अजित पवार यांच्या गटाचा बॅण्ड्रा MET येथे मेळावा सुरु आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या गटाचा यशवंत राव चव्हाण सेंटर येथे मेळावा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. अजित पवार यांच्याकडे तब्बल 44 आमदारांच समर्थन असल्याची महत्वाची माहिती आहे. टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या 42 आणि विधान परिषेदच्या 2 आमदारांच समर्थन आहे. याचा अर्थ शरद पवार यांच्या गटाकडे फक्त 12 आमदारांच समर्थन उरलं आहे.
या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमदारांची यादी जाणून घ्या
1 अदिती तटकरे
2 निलेश लंके
3 सुनील शेळके
4धर्मराव आत्राम
5 हसन मुश्रीफ
6 रामराजे निंबाळकर
7 धनंजय मुंडे
8 अजित पवार
9 दिलीप वळसे पाटील
10 छगन भुजबळ
11 अनिल पाटील
12 नरहरी झिरवळ
13 संजय बनसोडे
14 राजू कारमोरे
15 अण्णा बनसोडे
16 सुनील टिंगरे
17 माणिकराव कोकाटे
18 अनिकेत तटकरे
19 यशवंत माने
20 इंद्रनील नाईल
21 बाळासाहेब आकबे
22 राजेश पाटील
23 शेखर निकम
24 नितीन पवार
25 दत्ता भरणे
26 विक्रम काळे
27 संग्राम जगताप
28 मनोहर चंद्रिकापुरे
29 दिलीप मोहिते
30 सरोज आहिर
31 अमोल मिटकरी
32 प्रकाश सोळंखे
33 अतुल बेनके
शरद पवार यांच्या बैठीकाला उपस्थित असलेले आमदार
राजेश टोपे
सुमन पाटील
चेतन तुपे
सुनील भुसारा
संदीप क्षीरसागर