Maharashtra New CM Government Formation LIVE : देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
Maharashtra New CM Government Formation LIVE : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांची बैठक आज रात्री होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचे ताजे अपडेट्स...
LIVE NEWS & UPDATES
-
पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे- संजय शिरसाट
“आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल होत आहे. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल. उद्या दुपारपर्यंत कोणती खाती कुणाला मिळतील यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असं संजय शिरसाट म्हणाले.
-
देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केला आहे. यावेळी त्यांनी फोन करुन एकनाथ शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदेंमध्ये इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
-
-
रवी राणा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा सुरु
रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणीस यांच्या सागर निवासस्थानी रवी राणा हे पोहोचले आहेत. त्यांची बंद दाराआड काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरु आहे.
-
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, फेर मतमोजणीवर चर्चा करणार
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरवर संजय राऊतांनी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी ते फेरमतमोजणीवर चर्चा करणार आहेत.
-
बुलढाण्यात फटाके फोडण्यावरुन वाद, पोलिसांकडून शांततेचे आवाहन, 33 जणांवर गुन्हा दाखल
बुलढाण्यात काल रात्री धाड या गावी एका मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या वादातून प्रचंड दगडफेक व वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीसांनी 33 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. सध्या धाड या गावात तणाव पूर्ण शांतता असून पोलीसांचा मोठा बंदोबस्त गावात पाहायला मिळत आहे. सध्या पोलिसांकडून दंगेखोरांची धरपकड सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.
-
-
रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा, जालन्यातील तरुणाची मागणी
राज्यात मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. तर दुसरीकडे जालन्यातील एका तरुण कार्यकर्त्यांना भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. कृष्णा गायके असे या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत विविध पदे भूषविली असून तळागळातल्या लोकांशी त्यांचा जणसंपर्क असल्याचही या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.
-
Maharashtra News: शेतात काढून ठेवलेल्या नवीन लाल कांद्यातून पाच क्विंटल कांद्याची चोरी…
येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील कांदा चोरीची घटना… कांद्याचे दर चढे असल्यामुळे चोरट्यांचा कांद्यावर डल्ला… शेतकऱ्यांचे 25 ते 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान… चोरट्याला पकडून कडक कारवाई करण्याची शेतकऱ्यांची पोलिसांकडे मागणी…
-
-
Maharashtra News: दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल प्राप्त
सोलापूरची कराटे खेळाडू आर्या यादव हिने कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले आहे… दक्षिण आफ्रिकेमध्ये अकराव्या कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे… या स्पर्धेमध्ये 39 देशांचा समावेश असून यात भारताकडून 53 किलो वजनापर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये आर्या यादव हिने घवघवीत यश प्राप्त केले आहे… या यशामुळे आर्याने देशाची मान उंचावली आहे…
-
Maharashtra News: कडाक्याचे थंडीने भाजीपाल्याचे भाव कडाडलेत
पौष्टिक मानल्या जाणाऱ्या शेवग्याचे दर गगनाला भिडले आहेत… शेवग्याच्या दराने चिकनला देखील मागे टाकलं आहे. पिंपरी-चिंचवडच्या भाजी मंडईत शेवग्याचे दर प्रति किलो 400 ते 450, वाटाणा 100 ते 120 आणि मिर्ची 50 ते 60 रुपये प्रति किलो झाली आहे…
-
Maharashtra News: मंत्र्यांनाही भेटत नाहीत, शिंदेंची प्रकृती किती नाजूक आहे बघा – संजय राऊत
मंत्र्यांनाही भेटत नाहीत, शिंदेंची प्रकृती किती नाजूक आहे बघा… शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करुन देशात आग लावली – संजय राऊत
चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करुन देशात आग लावली… घटमाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाचं संरक्षण… राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य… निकाल लागून 10 दिवस, अजून सरकार स्थापनेचा दावा नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर
विधानसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पहिल्यांदा धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. जरांगे पाटील आज दुपारी तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेवून पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी जाणार आहेत. दरम्यान धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव ते तुळजापूर अशी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
-
मनसेचा ईव्हीएमविरोधात ठराव
मनसेच्या बैठकीत ईव्हीएमविरोधात ठराव करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जबाबदारीचे लवकरच वाटप होणार आहे. ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सर्व निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निराशा झटकून पुन्हा कामाला लागण्याच्या नेत्यांनी सूचना दिल्यात.
-
सोलापूरच्या आर्याचं घवघवीत यश
दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल प्राप्त झालं आहे. सोलापूरची कराटे खेळाडू आर्या यादव हिने कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये अकराव्या कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 39 देशांचा समावेश आहे. यात भारताकडून 53 किलो वजनापर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये आर्या यादव हिने घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशामुळे आर्याने देशाची मान उंचावली आहे.
-
एकनाथ शिंदे आज पुन्हा मुंबईमध्ये परतणार
दोन दिवस दरेगावमध्ये आराम करायला गेलेले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा मुंबईमध्ये परतणार आहेत. मुंबईत परतल्यानंतर काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पदाबाबत राज्यात आज संध्याकाळी महायुतीची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
धुळ्यात तापमानाचा पारा घसरला
धुळ्यात तापमानाचा पारा घसरला आहे. 6.1 अंश जिल्ह्याचे तापमान आहे. यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची आज नोंद झाली आहे. तापमान कमी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पहाटे पांझरा नदी किनारी फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. वाळलेल्या थंडीमुळे वृद्धांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचा आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशात एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावात आहेत. तिथून ते मुंबईत आज येणार आहेत. त्यानंतर ते काही महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर महयुतीचीदेखील महत्वाची बैठक होणार आहे. राज्यातील विविध शहरात कमी तापमानाची नोंद होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा प्रथमच तापमानाचा पारा 10.6 अंश सेल्सिअस पर्यंतखाली घसरला आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. धुळ्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. 6.1 अंश जिल्ह्याचे तापमान आहे. यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची आज नोंद झाली आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Dec 01,2024 9:09 AM