मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?

Maharashtra New CM Government Formation : सत्तास्थापनेबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. अशातच कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच महायुतीतील खातेवाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. कसं होणार खातेवाटप? वाचा सविस्तर...

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 10:06 AM

महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री असणार असल्याची माहिती आहे. आता या मंत्रिमडळात आपला समावेश असावा, यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेत्यांनी लॉबिंग सुरु केलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

खातेवाटपाचा फॉर्म्युला काय?

शिंदे सरकारमध्ये भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री होते. आता यंदाच्या महायुती सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यात भाजपचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 12, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असतील, अशी माहिती आहे.

शिवसेना शिंदे गटाने या विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 13 ते 16 मंत्रिपदांची मागणी केली. यापैकी 13 मंत्रिपद मिळणार आहेत. त्यापैकी 7 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्रिपदं असणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार निवडणून आले आहेत. अजित पवारांनी भाजपला पाच आमदारांमागे एक मंत्रिपद मागितलं आहे. त्यानुसार त्यांना 5 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या महायुती सरकारमध्ये 43 मंत्री असण्याची शक्यता आहे.

महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आज राजभवनवर जाणार आहेत. सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. तसंच भाजपची देखील आज महत्वाची बैठक होणार आहे. यात गटनेता निवडीबाबत मुख्यमंत्रिपदाबाबत आणि खातेवाटपाबाबतही चर्चा होणार आहे. उद्या संध्याकाळी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री आमि उपमुख्यमंत्र्यांसह इतर 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत.

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.