कालची सभा पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल!; नितेश राणे यांचं वज्रमूठ सभेवर टीकास्त्र

Nitesh Rane : संजय राऊत, मालक अन् वज्रमूठ सभा; नितेश राणे यांचं वज्रमूठ सभेवर टीकास्त्र, पाहा...

कालची सभा पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल!; नितेश राणे यांचं वज्रमूठ सभेवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 12:02 PM

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. “संजय राऊत याच्या मालकाने लहान मैदानात सभा घेतली. उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल”, असं नितेश राणे म्हणालेत. कालच्या सभेत अल्पसंख्याक लोक अधिक होते. उद्धव ठाकरे यांनी नाका खालचा मतदार त्यांना संघ राखता आला नाही, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

कालच्या सभेत मुस्लिम बांधवाना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?, असा सवालही नितेश राणे यांनी केलाय. अजित पवार करमुक्त आहेत. त्याच्यावर काही बोलणार नाही, असंही ते म्हणालेत.

आज ही माझी चौथी पत्रकार परिषद आहे. माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. ती लवकरच बाहेर काढेन. तुम्ही सातत्याने आमच्या पक्षावर आणि नेत्यावर टीका करता मग आम्ही गप्प बसणार नाही. उद्धवजी, संजय राऊत या शकुनी मामाला गप्प करा. नाहीतर राज्यात फिरता येणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

कालच्या वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अदानी यांचं चरित्र लिहा, जेणे करून लोकांना त्यांच्याविषयी माहिती मिळेल, असं म्हटलं त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. अदानींचं चरित्र लिहिण्यापेक्षा उद्धव ठाकरे तुमचं चरित्र लिहा. तुमचं इन्कम कुठून येतं? कोणतीही कंपनी नाही मग एवढं पैसे कुठून येतात? हे मराठी तरुणांना कळू द्या. तुम्ही मालामाल विकली कस झालात ते कळू द्या, असंही राणे म्हणाले आहेत.

आपल्या बॉडीगार्डच्या माध्यमातून खोके कसे पोचवले. आमच्याकडे सुद्धा राजपूत बॉडीगार्ड कसे खोके पोचवतो कॉल रेकॉर्ड आहेत. उद्धवजी सकाळच्या कामगाराला गप्प करा. उगाच मोहित कंबोजच्या नादाला लागू नकोस. आदित्य आणि तेजस यांचं नाईट लाईफ समोर येईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

‘केरला स्टोरी’ हा सिनेमा सत्यता सांगणारा आहे. आज मी सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहे आणि हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी केली आहे. हिंदू महिलांची सत्य स्थिती चित्रपटातून समोर येईल, असंही राणे म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.