पालघर: जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हिरड पाडा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची बाब समोर आल्यानंतर आता पालघर शहराजवळील नंडोरे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 30 विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ही बाधा झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य प्रशासन धावपळ करताना दिसत आहे. (Maharashtra Palghar news school students tested corona positive worst situation covid19 in Palghar district)
नंडोरे आश्रम शाळेतील 30 विद्यार्थ्यांना गेल्या दोन तीन दिवसात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या शाळेतील एका शिक्षकालाही कोरोना झालेला आहे. सुरुवातीला या शाळेतील तीन विद्यार्थिनींना लक्षणे आढळल्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आश्रम शाळेतील 193 विद्यार्थी व 34 शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 30 विद्यार्थी व एक शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत. आश्रमशाळेत 9 वी ते 12 वी पर्यंत 162 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर 34 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिकवत आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या व लक्षणे असलेल्या नऊ विद्यार्थिनींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात आले आहे. तर इतर लक्षणे नसलेल्या विद्यार्थ्यांना नंडोरे आश्रम शाळेतच विलगीकरण कक्ष उभारून वैद्यकीय चमूच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी दिली आहे. आश्रम शाळेमध्ये वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून आश्रम शाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांचे काही पालक आश्रम शाळेला घेराव घालून होते व त्यांनी गोंधळ घातला होता. मात्र, त्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांनी पालकांना विश्वासात घेऊन संबंधित विद्यार्थ्यांची योग्य ती निगा व काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर येथील वातावरण शांत झाले.
तुम्ही हलक्यावर घेऊ नका, नाहीतर तुम्हाला जड जाईल, IAS सुनील केंद्रेकरांचा अधिकाऱ्यांना रोखठोक इशारा https://t.co/kKbUTs0GSl #Beed | #coronavirus | #CoronaVaccine | #SunilKendrekar
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2021
संबंधित बातम्या:
कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा
कोरोनाला रोखण्याचे आव्हान, प्राण्यांनाही संसर्ग होत असल्याने खळबळ
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे
Maharashtra Palghar news school students tested corona positive worst situation covid19 in Palghar district