बॉस, ताई, दादा, बाबा, महाराष्ट्र पोलिसांचा फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांना इशारा

महाराष्ट्र पोलिसांनी एक खास ट्विट करत फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या हौशी वाहनचालकांना इशारा दिला आहे. (Maharashtra Police waring on Fancy number plate)

बॉस, ताई, दादा, बाबा, महाराष्ट्र पोलिसांचा फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांना इशारा
महाराष्ट्र पोलिसांची वाहनधारकांना वॉर्निगं
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 4:14 PM

मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी एक खास ट्विट करत हौशी वाहनचालकांना हे चालणार नाही, असा  इशारा दिला आहे. ‘बॉस’, ‘ताई’, ‘दादा’, ‘बाबा’ सर्वांनी लक्षात ठेवा, वाहनावर सजावटी ‘नंबर प्लेट’ लावल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतं असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी खास स्टाईलमध्ये केले आहे. गेल्या काही दिवसांपासून गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. (Maharashtra Police warns vehicle owners about fancy number plate in unique style)

महाराष्ट्र पोलिसांचं ट्विट

वाहनंही जप्त होऊ शकतात

दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहनं वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. जे अशा प्रकारच्या नंबर प्लेट वापरात त्या वाहनधारकासांठी महाराष्ट्र पोलिसांचं ट्विट ही धोक्याची घंटा आहे. वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट फॅन्सी आहेत, अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम उघडली आहे. बऱ्याच जणांवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. ज्यांच्यावर आधी कारवाई झालेली आहे, तरीसुद्धा ज्यांनी नंबर प्लेट्स बदललेल्या नाहीत, अशा लोकांची वाहनंही जप्त करण्यात आलेली आहेत.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट वाढत असतो.

संबंधित बातम्या :

‘दादा’, ‘मामा’ ते बुरी नजर वाले; फॅन्सी नंबर प्लेटवाले पुन्हा ट्रॅफिक पोलिसांच्या रडारवर

बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…

(Maharashtra Police warns vehicle owners about fancy number plate in unique style)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.