पालकमंत्रिपदाचे वाटप किती दिवसात होणार? फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांने थेट डेडलाईनच सांगितली, म्हणाला “हा निर्णय…”

मुंबई महानगरपालिकेसाठी आमचं ठरलंय. महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा. तिघांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकलेला दिसेल, असे ते म्हणाले.

पालकमंत्रिपदाचे वाटप किती दिवसात होणार? फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांने थेट डेडलाईनच सांगितली, म्हणाला हा निर्णय...
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 12:56 PM

Guardian Minister Distribution : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यानंतर हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच रात्री उशीरा खातेवाटप करण्यात आले. आता सध्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यावरुन शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तीनही पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच नाही

“महायुतीत पालकमंत्रिपदावरुन मोठा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच आता शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी पालकमंत्रिपदावरुन महायुतीत असलेल्या वादावर भाष्य केले आहे. आमच्या तीनही पक्षात मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नाही. तसंच पालकमंत्री पदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही”, असे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट सांगितले.

“सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना”

“आम्ही निवडून आल्या आल्या सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेब यांना दिले आहेत. आमच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेब यांना आहे. एक-दोन दिवसात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल आणि पालकमंत्र्यांसंदर्भात निर्णय होईल”, असे शंभुराज देसाई म्हणाले.

“आमच्या तीनही पक्षात मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती, तसेच पालकमंत्री पदावरून आमची कोणतीही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे. पण याचा सर्वस्वी निर्णय आमचे नेते घेतील. आमचा पक्ष शिस्त पाळणारा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मंत्री त्यांना जो विभाग मिळाला त्यामध्ये ते चांगलं काम करून दाखवतील. आम्ही हातात हात घालून चांगले काम करु”, असे शंभुराज देसाईंनी म्हटले.

“दोन दिवसात पालकमंत्रीपदाचे खातेवाटप”

“पालकमंत्री पदाचे अधिकृत नावाचा अंतिम निर्णय हे तिघेजण मिळून घेणार आहेत. खातेवाटप होईपर्यत चार दिवस याला हे खाते मिळणार, त्याला ते खाते मिळणार अशा बातम्या सुरू होत्या. पण खात देत असताना समतोल राखण्यात आला आहे. त्यामुळे जरा धीर धरा, येत्या दोन दिवसात पालकमंत्रीपदाचे खाते वाटप होईल. आमच्या तीन पक्षात मंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. तसेच पालकमंत्री पदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही”, असेही शंभुराज देसाई म्हणाले.

“मुंबई महानगरपालिकेसाठी आमचं ठरलंय”

यानंतर त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शिवसेना ठाकरे गट इतक्या बॅकफूटवर गेला आहे की ते एकमेकांच्या माथ्यावर खापर फोडण्याचे काम करत आहेत. काँग्रेस म्हणते काय करायचं ते करू द्या, राष्ट्रवादी म्हणते आम्ही देखील वेगळे लढू. विधानसभेत या तिन्ही पक्षांचे एकमत नसल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत त्यांना जे अपयश आलं, त्यामुळे त्यांचे त्यांना कळेना. पण महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल. मुंबई महानगरपालिकेसाठी आमचं ठरलंय. महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा. तिघांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकलेला दिसेल.”

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.