शिंदे गटाला पहिले ‘खिंडार’? 17 जुलैनंतर भूमिका जाहीर करणार, ‘या’ दोन आमदारांचा इशारा काय?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. आज संध्याकाळी याबाबत निर्णय अपेक्षित आहे. कुठलं खाते कुणालाही मिळाले तरी कंट्रोल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांना मंत्रिमंडळात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकच राजकीय धुरळा उडवून दिला. मात्र, यामुळे शिंद गटाच्या आमदारांमध्ये धुसफूस वाढत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देणार असल्याच्या बातमीमुळे या आमदारांची झोप उडाली आहे. त्यातच मंत्रिपदाचे वेध लागलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या दोन शिलेदारांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. तसेच, अजित पवार अर्थमंत्री होईल या केवळ माध्यमांच्या चर्चा आहेत तसे काही होणार नाही असेही हे दोघे आमदार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, आम्ही निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागणार आहोत. त्याला आम्ही योग्य उत्तर देवू. पण, काही लोकांना वाटते की आपण सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे या नोटीस आल्या आहेत. पण त्यांनी असे समजायचे काही कारण नाही असा टोला त्यांनी लगावला. .
उद्धव ठाकरे आता भाजपवर टीका करत आहेत. पण, 25 वर्ष भाजपासोबत होते तेव्हा त्यांना काही कळले नाही का? आता खालच्या पातळीवर जाऊन भाजपवर टिका करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे काहीही करू शकतात. निवडणूक आयोगाचे नावही ते बदलू शकतात, राज्य घटना बदलू शकतात. लोकशाहीचा ते वापर करतात, अशी टीकाही या आमदारांनी केली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. आज संध्याकाळी याबाबत निर्णय अपेक्षित आहे. कुठलं खाते कुणालाही मिळाले तरी कंट्रोल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची बैठक आहे, असेही हे आमदार म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
1 ते 2 दिवसात मंत्रिमंडळावर विस्तार होईल. आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलवले आहे. अजित पवार अर्थमंत्री होईल या माध्यमांच्या चर्चा आहे. आम्हाला मंत्रिपद मिळेल अशी अशा आहे. आम्ही दोघे मंत्री होणारच असा दावा शिंदे गटाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले आणि मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला.
अन्यथा भूमिका जाहीर करू…
राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जी वस्तुस्थिती आहे ती आहे. मात्र, मी ही मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे. मला मंत्रिपदाची संधी दिली तर रायगडचे पालकमंत्री पद हे माझ्याकडेच राहील. पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे हवे असे भरत गोगावले म्हणाले. तर, 17 जुलै पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. आम्ही दोघेही मंत्रिपदाच्या लाईनमध्ये आहोत. आम्ही दोघे मंत्री होणारच असेही त्यांनी सांगितले.