Rohit Patil | आरआर आबांच्या मुलाविरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल, रोहित पाटील म्हणतात, 23 वर्षांचा आहे, 25 पर्यंत कोणाला ठेवणार नाही

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत.

Rohit Patil | आरआर आबांच्या मुलाविरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल, रोहित पाटील म्हणतात, 23 वर्षांचा आहे, 25 पर्यंत कोणाला ठेवणार नाही
आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:29 PM

सांगली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील (R R Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. सांगली जिल्ह्यात (Sangli) रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत (Kavathe Mahankal Election) निवडणुकीत प्रचार करत आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे.

राष्ट्रवादी Vs महाविकास आघाडी पॅनेल

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना), सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे.

“माझं वय 23…”

कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची प्रचार सभा होती. यावेळी रोहितच्या भाषणाआधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणाले, की 25 वर्षांच्या तरुणा विरोधात सगळे एकत्र आले आहेत. यावर रोहितने उत्तर दिले की “राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय हे या तालुक्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले घटक आहेत. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माने सर, आपण सांगितलं की 25 वर्षांच्या तरुणाला हरवायला सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही”

रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. येत्या 23 तारखेला मतदान पार पडणार आहे.

संबंधित बातम्या :

रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र

रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवलाय, स्वतः थांबून उतरवून घे, आबांच्या मुलाला अजितदादांचा फोन, रोहित पाटलांची मध्यरात्री धडपड

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.