महाराष्ट्राच राजकारण तापलं, उद्धव ठाकरे यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा घेरण्याच्या तयारीत

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी ही प्रमुख मागणी ठाकरे गटाची आहे. ज्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल.

महाराष्ट्राच राजकारण तापलं, उद्धव ठाकरे यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा घेरण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 2:25 AM

मुंबई | शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या निर्णयाविरोधात, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरेंची आहे. तर दुसरीकडे व्हीपवरुन ठाकरे गटाला पुन्हा घेरण्याची रणनीती शिंदेंच्या शिवसेनेनं आखलीय. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं, एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी ही प्रमुख मागणी ठाकरे गटाची आहे. ज्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल.

ठाकरे गटानं म्हटलंय की, निवडणूक आयोगाची भूमिका निष्पक्ष नाही. निवडणूक आयोगाच्या कामकाजाची वागणूक घटनात्मक दर्जाला अनुसरुन नाही. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांच्या युक्तिवादाच्या आधारे निर्णय घेऊन आयोगानं चूक केलीय. पक्षात फूट पडल्याचा पुरावा नसताना आयोगाने दिलेला निर्णय चूक आहे.निवडणूक आयोगाने या प्रकरणाची घटनात्मक पातळीवर तपासणी केली नाही. पक्षाच्या संघटनेत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय.

5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सुनावणी सुरु आहे आणि आता शिवसेना शिंदेंना देण्याच्या आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात आलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं आणखी एक पेच निर्माण झालाय. तो म्हणजे व्हीपचा. अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 तारखेपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक रणनीती आखलीय.

हे सुद्धा वाचा

शिंदेंची शिवसेना सर्व 56 आमदारांना व्हीप बजावणार आहे. हा व्हीप ठाकरे गटाच्या 15 आमदारांनाही पाळावा लागेल असं शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणंय. व्हीप न पाळल्यास कारवाईचा इशाराही शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी दिलाय.

शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. पण कायदेशीर बाजूही समजून घेवूया, खरंच शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होतो का ? निवडणूक आयोगानं निकाल देताना म्हटलंय की, शिवसेनेत फूट पडलीय

लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्याआधारे आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना दिलंय. मात्र त्याचवेळी आयोगाच्या निर्णयानं शिवसेनेचे 2 भाग झालेत. एक शिवसेना आणि दुसरा ठाकरे गट. त्यामुळं ठाकरे गट हा तूर्तास वेगळाच पक्ष ठरल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही, असं घटनातज्ज्ञांचं मत आहे.

दुसरीकडे शिवसेना ताब्यात आल्यानंतर, शिंदे गटाकडून कार्यालयं ताब्यात घेण्यास सुरुवात झालीय. विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलाय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या परवानगीनं विधीमंडळातल्या कार्यालयात शिंदेंच्या शिवसेनेनं एंट्री केली.

विधीमंडळाचं कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर, आता शिंदेंची शिवसेना मुंबई महापालिकेच्या कार्यालयाकडेही मोर्चा वळवणार आहेत. त्यामुळं पुढचा संघर्ष शाखा आणि कार्यालयच ताब्यात घेण्यावरुन असेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.