“पुरग्रस्त भागातील पंचनाम्यांना आजपासून सुरुवात, अन्नधान्य अन् 5 हजारांची आर्थिक मदत मिळणार”

पुरग्रस्त भागातील लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी,आजपासून पंचनाम्यांना सुरुवात; अन्नधान्य अन् आर्थिक मदत मिळणार; मंत्री अनिल पाटील यांची घोषणा

पुरग्रस्त भागातील पंचनाम्यांना आजपासून सुरुवात, अन्नधान्य अन् 5 हजारांची आर्थिक मदत मिळणार
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 8:21 AM

मुंबई | 24 जुलै 2023 : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. पिकंच्या पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. घरांची पडझड झाली आहे. शिवाय घरातलं साहित्य वाहून गेलंय. राहतं घर पाण्याच्या विळख्यात सापडलंय. सर्वसामान्य लोकांचे हाल झालेत. शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आजपासून पुरग्रस्त भागांचे पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत. तसंच तात्काळ पुरग्रस्तभागातील लोकांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसंच अन्नधान्याचीही मदत सरकार आजपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे.

जगायचं कसं?

या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे शेती खरडून गेलीय. अशात पिकांचं नुकसान तर झालंच आहे. पण कसदार शेतीच वाहून गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.

यवतमाळमधील महागावमध्येही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अशात योगेश नावाच्या युवा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या दहा एकर शेतीचं नुकसान झालं आहे. जनावरांना खाण्यासाठी चाराही शिल्लक नाहीये. अशात जनावरांना घेऊन चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.

“आम्हाला पुरेशी मदत करा”

मुसळधार पावसामुळे राज्यभरात शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झालाय. शेतीच्या झालेल्या या नुकसानीमुळे जगायचं कसं? असा सवाल शेतकऱ्यापुढे उभा राहिलाय. अशात सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी करत आहेत. सरकारने तुटपुंजी मदत करू नये तर भर भक्कम मदत करावी, जेणे करून आम्ही पुन्हा उभं राहू शकू. आमचे संसार वाहून गेलेत. ज्यावर आमचं घर चालतं ती शेती वाहून गेलीय. अशात आम्हाला पुन्हा उभं राहायचं असेल तर आर्थिक मदत गरजेची आहे, असं शेतकरी म्हणत आहेत.

दरम्यान, सध्याही महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय, अशात शेतीचं मोठं नुकसान होतंय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची पाणी पातळी 39.3 इंचावर पोहचली आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावासाची रिमझिम कायम आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.