महाराष्ट्रातील बहुतांश धरणं भरली, काही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
जुलै महिन्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरण भरली आहे. तर काही धरणं भरण्याच्या उंबठ्यावर आहेत.
महाराष्ट्र : मागच्या महिन्यात महाराष्ट्रात (maharashtra rain update) अधिक पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rain in maharashtra) झाल्याचं पाहायला मिळालं. जून महिन्यात अजिबात पाऊस न झालेल्या भागात इतका पाऊस झाला की, नदी नाल्यांना पूर आला. महाराष्ट्रातील अनेक धरणं (maharashtra dam water level) मुसळधार पावसामुळे भरली आहेत. तर काही धरण भरण्याच्या उंबठ्यावर असल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक धरण पुर्णपणे क्षमतेने भरली आहेत. विशेष म्हणजे ज्या धरणांचा पाणीसाठा मोठा आहे. ती धरण भरण्याच्या उंबठ्यावर आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. परंतु जुलै महिन्यात अनेक धरणं भरल्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी अनेक धरण भरली आहेत. तर काही धरण भरण्याच्या उंबठ्यावर आहेत. सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरण 72 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे सांडव्याचे चारही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्याने काठावरील स्थलांतरीत गावातील प्राथमिक शाळेची जुनी इमारत मंदिरे पाण्यात गेली आहेत.
भंडारदरा धरण पुन्हा एकदा 15 ऑगस्ट पूर्वीच तुडूंब भरले असून निळवंडे धरण देखील 85 टक्के भरले आहेत. धरणाच्या दरवाज्यातून प्रवरा नदीच्या पात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. भंडारदरा परिसरात पावसाची अजूनही रिपरिप सुरू आहे. निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यंटकांची मोठी गर्दी पहायला घटनास्थळी पाहायला मिळत आहे. जिल्हयात मात्र पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात सापडली आहेत. पाऊस न पडल्यास पिकांना धोका होण्याची शक्यता आहे.