Maharashtra Rain : विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात 72 तासात मुसळधार पावसाचा इशारा, सर्व यंत्रणा हाय अलर्टवर
गडचिरोली जिल्ह्यात येत्या 72 तासात विदर्भासह गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
गडचिरोली : राज्यात 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (Meteorological Department) देण्यात आलाय. विशेषत: कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात येत्या 72 तासात विदर्भासह गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना तातडीने मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच जिल्ह्यातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, पुढील 72 तास मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे कुणीही विनाकारण बाहेर पडू नये. मुसळधार पावसावेळी कुठल्याही पुलावरुन पाणी वाहत असताना कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा गडचिरोलीसह विदर्भाला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. विदर्भात पुढील चार दिवस हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय.
Pune rainfall distribution in last 24 hrs on 10 July pic.twitter.com/kPv3wKU6rz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2022
पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याकडून राज्यात 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय. त्यामुळे कोकणवासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
10 Jul:Possibility of Isol Very Hevy (VH) & Hevy to VH with isol Extremely Hevy (VH-EHR) rains in Maharashtra during 5 days VH VH – EHR Konkan: 10 Jul 11-14 M Mah: 10-14 ghats Marathwada:11,12 Vidarbha: 13 10-12 pic.twitter.com/IDkMrmaqKm
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2022
राज्यात NDRF आणि SDRF च्या 15 तुकड्या तैनात
अतिवृष्टी आणि पूरसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई – 2, पालघर – 1, रायगड, महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी, चिपळूण – 2, सिंधुदुर्ग – 1, सातारा – 1, कोल्हापूर – 2 अशा ठिकाणी NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर नांदेड, गडचिरोली अशा दोन ठिकाणी एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.