महाराष्ट्राला दिलासा, कोरोनाबाधितांपेक्षा डिस्चार्ज घेतलेल्या रुग्णांची संख्या जास्त, 24 तासात 74045 बाधित कोरोनामुक्त

गेल्या 24 तासांत 66 हजार 836 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर एकाच दिवसात 74 हजार 45 इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

महाराष्ट्राला दिलासा, कोरोनाबाधितांपेक्षा डिस्चार्ज घेतलेल्या रुग्णांची संख्या जास्त, 24 तासात 74045 बाधित कोरोनामुक्त
Corona virus
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 12:11 AM

मुंबई : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी काल (गुरुवार) रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच महाराष्ट्राला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 66 हजार 836 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्याचवेळी एकाच दिवसात 74 हजार 45 इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं पहिल्यांदाज घडलंय, जेव्हा नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात आज 773 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. (Maharashtra recorded 66836 new coronavirus patients in last 24 hours, 74025 got recovered)

राज्यात करोनाचा उद्रेक कायम आहे. गेले काही दिवस सातत्याने 60 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात काल आणि आज मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सात लाखांच्या आत ठेवण्यात यश आलं आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातूर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात मुंबईत 9 हजार 541 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 7 हजार 221 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा मुंबईतील दर 84 टक्के आहे. मुंबईत सध्या 81 हजार 538 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 52 दिवसांवर पोहोचलाय. दरम्यान, मुंबईतील मृतांची संख्या मात्र चिंताजनक बनत चालली आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुणे महापालिका हद्दीत सलग पाचव्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज पुण्यात 5 हजार 634 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 465 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुण्यातील मृतांची संख्या चिंताजनक बनली आहे. पुण्यात आज दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 50 हजार 325 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजच्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 91 हजार 495 वर पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 34 जार 782 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 388 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Strict Lockdown: ब्रेक द चेन; आजपासून कडक निर्बंध, नवे नियम काय?

Video : ऑक्सिजनची कमतरता, रुग्ण मृत्यूच्या दाढेत, रुग्णालयाचे हतबल सीईओ ढसाढसा रडले!

(Maharashtra recorded 66836 new coronavirus patients in last 24 hours, 74025 got recovered)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.