Corona Update : सावधान! राज्यात आज नवे 4255 कोरोना रुग्ण, दोन दिवसांत रुग्णसंख्या तिप्पट
लोकांच्या या निष्काळजीपणामुळेच राज्यातली कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update) आता पुन्हा दर दिवशी चार हजारांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

मुंबई : राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या (Today Corona Numbers) पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वाजनिक ठिकाणी नियमांचं पालन करा, मास्क लावा (Mask) असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरीही काही लोक ऐकायला तायर नाहीत. लोकांच्या या निष्काळजीपणामुळेच राज्यातली कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update) आता पुन्हा दर दिवशी चार हजारांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज 4255 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. तसेच मुंबईतील कोरोना रुग्णांची सख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. मुंंबई जवळच्या उनगरातील रुग्णही वाढत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध नको असतील तर नियमांचं पालन काटेकोरपणे होणं अत्यंत गरजेचं आहे.
सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली
रोजची कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असल्याने राज्यातली सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 20,634 वर पोहचल्याची ताजी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात बीए 4 बीए 5 या रुग्णांत वाढ होत असून नागपूर येथे गुरुवारी बीए-5 चे दोन रुग्ण आढळले आहेत.
नागपूर प्रशासन अलर्ट मोडवर
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
Maharashtra reports 4,255 new COVID19 cases today; Active cases rise to 20,634 pic.twitter.com/pbumBcIJms
— ANI (@ANI) June 16, 2022
देशातील रुग्णसंख्येतही मोठी वाढ
भारतामध्ये गेल्या 24 तासात 12,213 नवीन कोविड रुग्णांची भर पडली आहे. 26 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच एका दिवसात इन्फेक्शनने 10,000 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशाचीही चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्ययंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकासान केलं आहे. तिसरी लाट एवढी प्रभावी नव्हती. मात्र आता चौथी लाट रोखण्याचेही आव्हान असणार आहे.