ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली. महिलांना तर अर्ध्या तिकीटात प्रवास सुरु केला परंतू आता या कॅटगरीच्या लोकांनी ही सवलत बंद झाली आहे.

ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय
hirkani1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 2:00 PM

मुंबई : एसटीच्या ( MSRTC ) गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो. त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो. आता एसटीने अलिकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ( Senior citizen )  संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनणायला वेळ लागणार नाही. परंतू आता एसटी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे. एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते पाहूयात…

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मूभा दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते. याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते. आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद

महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रक अनूसार एसटीतून सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती. आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित  अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) शि.मं.जगताप यांनी दिले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.