SSC HSC exam : सध्या परीक्षा घेणे योग्य आहे का? विद्यार्थ्यांच्या मनातील 5 प्रश्नांची उत्तरे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC exam) ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत.
मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC exam) ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत. बारावीची परीक्षा आता मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे (Corona) शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. (Maharashtra SSC HSC exam postponed 5 questions every student wants to know their answer)
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांवर महाराष्ट्र इंग्रजी शाळा असोसिएशनचे ट्रस्टी संजयराव तायडे पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे.
प्रश्न:- सध्याच्या काळात परीक्षा घेणे योग्य आहे का?
संजय पाटील यांचे उत्तर:- विद्यार्थांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. परीक्षा थांबवणे म्हणजे शिक्षण खातं कमी पडलंय असं दिसतं.
प्रश्न:- या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा प्रमोट करणे उचित ठरेल का?
उत्तर:-दहावी-बारावी परीक्षा म्हणजे विद्यार्थांच्या जिवनातील एक टर्निंग पाँईंट असतो म्हणून प्रमोट करणे उचित होणार नाही
प्रश्न:- जर परीक्षा घेतल्या तर त्याची पद्धत कशी असावी?
उत्तर:- वर्षभर शिक्षण मंत्री आणि त्यांचे सहकारी ऑनलाईन शिक्षण देत असल्याचा ढोल पिटवत होते. ते किती पोकळ होते हे आत्ताच्या परिस्थितीत आपण ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाही यावरून सिद्ध होतंय. याउलट इंग्रजी शाळांना रूपायाची मदत नाही , पालक फी भरत नाही आरटीईचा परतावा नाही प्रचंड आर्थिक ताण सोसूनदेखील त्यांनी ऑनलाईन शिक्षण सूरूच ठेवलं. त्यामुळे परीक्षा झाल्या तरी त्या शिक्षण खात्याच्या नाकर्तेपणामुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांंचा विचार करता नाईलाजाने ऑफलाईनच घ्याव्या लागतील.
प्रश्न:- दहावी-बारावीच्या परीक्षा बोर्डाने दिलेल्या केंद्रावर की शाळांमध्ये परीक्षा व्हाव्यात?
उत्तर:- ज्या प्रमाणे कोरोना संसर्ग वाढतोय त्यानुसार विचार केला तर या परीक्षा शाळांमधेच व्हायला हव्यात.
प्रश्न:- मुलं परीक्षा देण्याच्या मानसिकतेत आहेत का?
उत्तर:- इंग्रजी शाळेत शिकणारे विद्यार्थी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायला तयार आहेत कारण त्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. परंतु सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांची मानसिकता नाही. याला कारण शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन त्यांना काही शिकवलंच नाही. त्या बिचारे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया घालवलं यांनी याला जवाबदार हे गोंधळलेलं शिक्षण विभाग आणि त्यांचे मंत्री नाही तर कोण?
(टीप : वरील प्रश्नांची उत्तरं ही महाराष्ट्र इंग्रजी शाळा असोसिएशनचे ट्रस्टी संजयराव तायडे पाटील यांची वैयक्तिक आहेत)
संबंधित बातम्या