Co-Operative society Election | झेडपी पाठोपाठ राज्यात सहकारी सोसायट्यांच्याही निवडणुकीचे ढोल, 20 सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश
Co Operative society | सहकारी संस्थांच्या निवडणुका (co operative election) लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई : सहकारी संस्थांच्या निवडणुका (co operative election) लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या 20 सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. (maharashtra state co operative election authority ordered to start election process of cooperative societies from 20 september)
निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही सुरु करा
कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, आता निवडणूक लांबवणे शक्य नसून त्या होतीलच असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. या भूमिकेनंतर प्राधिकरणाने निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांत घेण्यासाठी कार्यवाही सुरु करा असं प्राधिकरणानं म्हटलंय. तसेच त्यासाठी प्राधिकरणाने एक स्वतंत्र पत्रक काढले आहे.
गृहनिर्माण संस्था वगळता इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार
प्राधिकरणाने येत्या 20 सप्टेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्था सोडून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यासाठी मतदारांच्या याद्या तयार करुन सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्राधिकरणाने सांगितले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगूल वाजलं, 5 ऑक्टोबरला मतदान
कोरोना माहमारी तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्याविषयी निवडणूक आयोगाने आजच (13 सप्टेंबर) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येईल. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल. सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल.
राजकीय वातावरण चांगलेच तापणार
दरम्यान, राज्यात जिल्हापरिषदा तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या कोरोना महामारीचा प्रभाव असला तरी या निवडणुकांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे आगमी काळात राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असणार आहे.
इतर बातम्या :
MPSC 2020 Exam Date | विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! एमपीएससीची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला
‘मुश्रीफांसाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
मुंबईत महिला सुरक्षित कशा राहणार? पोलीस आयुक्तांच्या 10 मोठ्या सूचना
लग्नासाठी पठ्ठ्याने 80 हजार दिले, तरीही नवरी पळाली, पाण्याची बाटली आणायला सांगून गंडवलं !https://t.co/zAKTSUO6CX#Crime #bride #groom
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
(maharashtra state co operative election authority ordered to start election process of cooperative societies from 20 september)