महत्वाची बातमी: लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट, जनावरांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय
लम्पी आजाराचा प्रसार वाढतो आहे. हा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.
मुंबई : लम्पी (Lumpy) आजाराचा प्रसार वाढतो आहे. हा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. लम्पीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लसीकरणाची (Vaccination of Animals) गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. सोमवार-मंगळवारपर्यंत राज्यात 50 लाख लस उपलब्ध होणार आहेत. या लसींचं जिल्हानिहाय वाटप केलं जाणार आहे.
Non Stop LIVE Update