विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज, 3 डिसेंबरला निकाल

राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. (Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2020 Voting)

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज, 3 डिसेंबरला निकाल
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 8:25 AM

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. (Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2020 Voting)

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ

विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी विभागात 4 लाख 32 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 74 हजार 860 इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवारदेखील या रिंगणात उतरले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सतिश चव्हाण यांची ही सलग तिसरी निवडणूक आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपवासी झाल्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही. (Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2020 Voting)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडणार आहे. मराठवाडा पदवीधरसाठी मतदारसंघासाठी 3 लाख 74 हजार 45 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 813 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात खरी लढत आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदान केंद्रात निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नागपूर मतदारसंघात 322 मतदान केंद्रात मतदान पार पडत आहे. नागपूर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडूनही नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना संधी देण्यात आली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ

अमरावती शिक्षक मतदारसंघात वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदेही मैदानात असल्याने भाजप उमेदवारासमोरिल डोकेदुखी वाढली आहे.

?पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप) vs जयंत आसगावकर (काँग्रेस) vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs अभिजीत बिचुकले vs सोमनाथ साळुंखे (वंचित)

?नागपुरातून रिंगणात कोण?

संदीप जोशी (भाजप) vs अभिजित वंजारी (काँग्रेस) vs राहुल वानखेडे (वंचित)

?औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) (Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2020 Voting)

संबंधित बातम्या : 

Pankaja Munde Isolated | विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाची धामधूम, मतदानापूर्वी पंकजा मुंडे ‘आयसोलेट’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.