आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ऑफलाइन परीक्षा सुरू; कधीपर्यंत चालणार पेपर, कोणाचा लागला निकाल?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 28 फेब्रुवारी ते 21 मार्च 2022 कालावधीत घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षा राज्यातील 184 परीक्षा केद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी 83948 इतके विद्यार्थी बसणार आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ऑफलाइन परीक्षा सुरू; कधीपर्यंत चालणार पेपर, कोणाचा लागला निकाल?
Maharashtra University of Health Sciences, Nashik
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 3:01 PM

नाशिकः नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2021 अभ्यासक्रमाच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम व अंतिम वर्षाच्या परीक्षा व दंत, आयुर्वेदिक (Ayurved), युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी (Physiotherapy), ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅग्वेज पॅथालॉजी (Language Pathology), ऑडिओलॉजी आदी विषयांच्या लेखी परीक्षा ऑफलाइन घेण्यात येत आहेत. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरु व कुलसचिव यांचे मार्गदर्शन आहे. त्यानुसार या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने व कोविड सुरक्षित वातावरणात घेण्यात येणार आहेत. यासाठी परीक्षा केंद्र व परीक्षा खोल्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा कधी?

ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या राज्यातील 40 परीक्षा केंद्रांत परीक्षा घेण्यात येत अूसन, या परीक्षेसाठी 2335 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परिधान करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन व लिक्विड सॅनीटायझारचा वापर करण्याबाबत केंद्रप्रुखांना निर्देशित करण्यात आले आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

सीसीटीव्ही लावले

परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक, अंतर्गत दक्षता पथक, केंद्रप्रमुख, केंद्र निरीक्षक, भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) वितरित करण्यात आली आहेत. हिवाळी -2021 परीक्षेसाठी प्रति परीक्षा केंद्र रुपये वीस हजार इतक्या रकमेची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे.

तिसऱ्या टप्प्यांतील परीक्षा कधी?

परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम, अतिविशेषोपचार व प्रथम वर्ष एम.बी.बी.एस जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा माहे डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 28 फेब्रुवारी ते 21 मार्च 2022 कालावधीत घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षा राज्यातील 184 परीक्षा केद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी 83948 इतके विद्यार्थी बसणार आहेत.

संकेतस्थळावर माहिती

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने वेळापत्रकानुसार होणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेसंबंधी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. परीक्षेसाठी उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, प्रमोद पाटील, संतोष कोकाटे, शिल्पा पवार, योगिता पाटील, दीपक सांगळे, विजय जोंधळे, अनुपमा पाटील, मुकुंदा मुळे, सतीश केदारे, चंदा भिसे, मनोज कोतवाल यांनी परिश्रम घेतले आहे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.