Dahisar VidhanSabha : दहीसरमध्ये मतदारांचा कौल कुणाला ? भाजप किल्ला अभेद्य ठेवणार का ? यंदा हॅटट्रिक होणार की…
Dahisar VidhanSabha : दहिसर हा मुंबई उत्तर लोकसभा संघाचा एक भाग आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी काँग्रेसच्या अरूण सावंत यांना हरवून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. यंदाही भाजपचा हा किल्ला अभेद्य राहणार की काही वेगळं चित्र पहायला मिळणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
येत्या 20 नोव्हेंबर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. महायुती वि. महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना यंदा रंगणार असून जनता कोणाच्या पारड्यात मतांचा कौल टाकते आणि कोणाला सत्तास्थापनेची संधि देते हे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असलेला दहिसर मतदारसंघ बराच चर्चेत असतो. एकेकाळी शिवसेनेचा गड म्हणून ओळख असलेल्या दहिसर मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनात पक्षाचे वर्चस्व आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत भाजपच्या मनिषा अशोक चौधरी विजयी झाल्या. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपाने दणदणीत विजय मिळवत सर्वांचा पराभव केला. त्यामध्ये मिनषा चौधरी यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा पराभव केला. तर 2019 मध्ये त्यांनी विजयाची पुनरावृत्ती करत काँग्रेस पक्षाचे अरूण सावंत यांना पराभूत केले. त्यामुळे यंदा 2024 च्या निवडणुकीतही त्या विजयाची हॅटट्रिक करतात का आणि भाजपला हा मतदारसंघ राखता येतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला सुटते, तिथे कोणता उमेदवार जाहीर होतो, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.
दहिसर मतदार संघाची स्थिती
दहिसर मतदारसंघ हा उत्तर मुंबईतील सर्वात शेवटचा मतदार संघ आहे. या भागात मराठी भाषिक लोक बहुसंख्य आहेत, तसेच उत्तर भारतीय आणि व्यापारी हेही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत दहिसर मतदारसंघात एकूण 54.46 टक्के मतदान झाले. 1 लाख 35 हजार 055 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमदेवार मनिषा अशोक चौधरी या 87,607 मतं मिळवून विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या अरूण सावंत यांचा 63,917 मतांनी पराभव केला. अरूण सावंत हे 23, 690 मतं मिळाली.
तर 2014 च्या निवडणुकीतही मनिषा चौधरी याच निवडून आल्या होत्या. त्यावेळी 1 लाख 59 हजार 873 मतदारांनी मतदान केले, तेव्हा एकूण 50.5 टक्के मतदान झाले. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत मनिषा चौधरी 77, 238 मतं मिळाली. तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना 38,660 मतं मिळाली. चौधरी यांनी घोसाळकर यांचा 38, 578 मतांना पराभव केला.