Maharashtra budget session 2021 LIVE | डॉक्टरांचा सल्ला घेत होता की कंपाऊंडरचा?, सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 24, 2021 | 7:02 AM

शेतकरी, वाढीव वीज बिल, यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session Day 2)

Maharashtra budget session 2021 LIVE | डॉक्टरांचा सल्ला घेत होता की कंपाऊंडरचा?, सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात : देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session day 2 live updates) दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी भाजप नेते वाढीव वीज बिल मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ऊर्जा विभागाकडून वीज बिल मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचं आणि घरगुती ग्राहकांची वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Mar 2021 02:20 PM (IST)

    महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत 4 थ्या क्रमांकवर गेला: देवेंद्र फडणवीस

    – महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत ४ थ्या क्रमांकवर गेला – गुजरात, कर्नाटक, दिल्लीनंतर महाराष्ट्र आहे – चीन बदनाम होत असताना आपण परदेशी गुंतवणुकदारा्ना आकर्षित करू शकत नाही – त्यामुळे कितीही दावे केले तरी त्यात अर्थ नाही

  • 02 Mar 2021 01:28 PM (IST)

    मंदिरात कोरोना वाढत असल्याचं सरकारला वाटत: देवेंद्र फडणवीस

    या सरकारला मंदिरात कोरोना वाढतो आहे, असं वाटतेय.देशभरात धार्मिक स्थळे उघडली तिथे कोविड होत नाही-पण महाराष्ट्र मात्र धार्मिक स्थळ कोविड वाढत आहे, असं सरकारला वाटतं असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  • 02 Mar 2021 01:27 PM (IST)

    कमी वेळेत कोविडसाठी विक्रमी हॉस्पिटलची उभारणी केलीत त्यात विक्रमी भ्रष्टाचार: देवेंद्र फडणवीस

    कमी वेळेत विक्रमी कोविड हॉस्पिटल आम्ही उभं केलं अस तुम्ही म्हणालेत -तुम्ही केलं मात्र त्यात विक्रमी भ्रष्टचार झाला – 1000 खुर्च्यांच भाडं साडेचार लाख रुपये – एका फॅनच भाडं 9 हजार रुपये -उद्या आम्ही या संदर्भात उद्या पुस्तिका काढणार आहोत -कोविडच्या काळात मनमानी कारभार करण्यात आली -कोविड संदर्भात रस्ते विकास महामंडळ याच्या अधिकाऱ्याकडे नोडल ऑफिसर म्हणून जब्बादरी देण्यात आली – ज्या कंपनीला काम दिल तीचा काही अनुभव आहे का – डॉक्टर यांची जबाबदारी कँपौडर याना देणायत अली -मुख्यमंत्री म्हणतात की माझा आवाज तुमच्या पर्यँत पोहचतो का -मुख्यमंत्री साहेब तुमचा आवाज महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहचत नाही

  • 02 Mar 2021 12:58 PM (IST)

    अमरावतीमध्ये पुन्हा लॉकडाऊन कशाच्या आधारावर करण्यात आलं?: देवेंद्र फडणवीस

    कोरोनामुळे महाराष्ट्रात 52 हजार 184 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्या कमी केली गेली आहे. चाचण्यांची संख्या कमी केली गेली तरी संक्रमणाची परिस्थिती निर्माण झालीय, असं असताना सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेतेय. अमरावतीमध्ये पुन्हा लॉकडाऊन कशाच्या आधारावर करण्यात आलं?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    -जसं चौकात भाषण करतो तसं भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं – जर आकडेवारी दिली असती तर आपण उघडे पडले असतो -ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9 टक्के आहे तिथे 52 हजार मृत्यू, म्हणजे 33 ते 34 टक्के – मग तुम्ही काय केलं – डॉक्टरांचा सल्ला घेत होता की कंपाऊंडरचा – कशाची पाठ थोपटून घेता, जास्त सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत – पहिल्यांदा माझे कुटुंब माझी जबाबदारी, आता मीच जबाबदार – म्हणजे सरकार हात झटकून मोकळे, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या – म्हणजे अर्धी जबाबदारी जनतेची आणि अर्धी मोदींची तुमची जबाबदारी काहीच नाही – जम्बो कोविड सेंटर उघडली, कोरोनात काम केलं, औषधं दिली पण किती दिली याची माहिती नाही – शब्दांची रत्न लावून विकास साधता येत नाही – यमक जुळवून गमक साधता येत नाही – आपण चाचण्यांची संख्या कमी करत आणली तरी संक्रमणाची स्थिती आश्चर्यकारक आहे – अमरावतीत चाचण्यांचे रॅकेट समोर आले, नवी मुंबईत तर चाचण्या न करताच पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले गेले – आम्ही लॉकडाऊनमध्ये अडचणीत येणार्‍या लहान व्यापा-यांना मदत करणार नाही, कारण त्यांची जबाबदारी – लॉकडाऊन आता कशाच्या आधारावर केले – ज्यांच्या मनात आले ते लॉकडाऊन करतोय

  • 02 Mar 2021 12:13 PM (IST)

    एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्रिपदाचं मटेरियल राज्यमंत्र्यांसारखं वागू नका : सुधीर मुनगंटीवार

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे  यांना टोला.  एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्रिपदाचं मटेरियल राज्यमंत्र्यांसारखं वागू नका, असं मुनगंटीवार म्हणाले

  • 02 Mar 2021 11:18 AM (IST)

    विधानसभेत बेस्ट उपक्रमावर चर्चा सुरु

    भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बेस्ट उपक्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत आहेत. बेस्ट उपक्रमासंबंधी चर्चा विधानसभेत सुरु आहे.

  • 02 Mar 2021 11:11 AM (IST)

    शिवसेनेचे आमदार केंद्र सरकारचा निषेध करणारे पोस्टर घेऊन सभागृहात

    रवी राणा यांनी पोस्टर घेऊन आले ,अमरावतीमध्ये लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी, सेनेचे आमदार केंद्र सरकारचा निषेध करणारे पोस्टर घेऊन सभागृहात आले. दोन्ही सत्ताधारी, विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये पोस्टर घेऊन आले, पोस्टर बाहेर नेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

  • 02 Mar 2021 11:07 AM (IST)

    राज्यातील शेतकऱ्यांचं आणि घरगुती ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल: अजित पवार

    ऊर्जा विभागाच्या वीज बिल मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचं आणि घरगुती ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्याची वीज कनेक्शन तोडली गेली असतील त्यांची कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची मागणी केली.

  • 02 Mar 2021 11:04 AM (IST)

    वाढीव वीज बिल मुद्यावर चर्चा घ्या, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मागणी

    वाढीव वीज बिल मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाढीव वीज बिल मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले.

  • 02 Mar 2021 10:48 AM (IST)

    राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होणार

    विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचं शासकीय नियमाप्रमाणं कामकाज होईल. तर राज्यपालांच्या अभिभाषणावर पहिल्या दिवसाची चर्चा आज सुरु होईल.

  • 02 Mar 2021 10:45 AM (IST)

    विधिमंडळाच्या कामकाजात आज काय होणार?

    विधिमंडळाच्या कामकाजात आज काय होणार?

  • 02 Mar 2021 10:41 AM (IST)

    विधिमंडळ परिसरात भाजपचं ठिय्या आंदोलन, वीज बिलप्रश्नी सरकारला घेरण्याची तयारी

    विधानभवनाच्या परिसरात भाजप आमदारांनी ठिय्या आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना वीज बिलमाफी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारकडून वीज कनेक्शन कट केली जात आहेत.

  • 02 Mar 2021 10:39 AM (IST)

    विधानभवनाच्या गेटवर भाजप आमदार राम सातपुतेंचे आंदोलन

    विधानभवनाच्या गेटवर भाजप आमदार राम सातपुते यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांना वीज बिलमाफी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारकडून वीज कनेक्शन कट केली जात आहेत. सरकारनं वीज बिलाच्या मुद्यावर सावकारकी सुरु केली आहे. सरकार नीट वागलं नाही तर सरकारच्या डोक्यात कृषीपंप घालण्यात येईल, असा इशारा राम सातपुते यांनी दिला.

Published On - Mar 02,2021 2:20 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.