VIDEO | काँक्रिट फोडून सुखरुप बाहेर, गटारात पडलेल्या कुत्र्याला दहा तासांनी जीवदान
विरार पूर्व भागातील वीर सावरकर रोडवरील लक्ष्मी दर्शन या अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. टॉयलेटच्या गटारात पडलेल्या कुत्र्याला 10 तासांनंतर जीवनदान मिळालं आहे.
विरार : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारा प्रकार विरारमध्ये समोर आला आहे. टॉयलेटच्या गटारात पडलेल्या कुत्र्याला प्राणीमित्रांनी जीवदान दिलं. गटारावरील काँक्रिट फोडून तब्बल दहा तासांच्या प्रयत्नांनंतर कुत्र्याला बाहेर काढण्यात यश आलं.
नेमकं काय घडलं?
विरार पूर्व भागातील वीर सावरकर रोडवरील लक्ष्मी दर्शन या अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. टॉयलेटच्या गटारात पडलेल्या कुत्र्याला 10 तासांनंतर जीवनदान मिळालं आहे. शनिवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास एक कुत्रा गटारात पडला होता. गटारात पडलेला सारखा कुत्रा भुंकत असल्याने स्थनिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली.
गटारावरील काँक्रीट फोडलं
रहिवाशांनी त्वरित स्थानिक प्राणी मित्र आणि वसई-विरार अग्निशमन विभागाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन विभागाच्या जवानांनी गटारावरील काँक्रीट फोडलं. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कुत्र्याला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
रात्रीच्या अंधारात पडल्याचा अंदाज
कुत्रा नेमका गटारात कसा पडला, हे अद्याप समजलेलं नाही. मात्र रात्रीच्या अंधारात न दिसल्यामुळे तो उघड्या भागातून आत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उपचारासाठी रुग्णालयात
प्राणी मित्र आणि स्थानिक नागरिकांनी या कुत्र्याला आंघोळ घालून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अडचणीत सापडलेल्या एका मुक्या प्राण्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर स्थानिक नागरिकांचा जीवही भांड्यात पडला.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
शिवेसना पदाधिकाऱ्याचा कारनामा, स्वत:वर गोळीबार झाल्याचा रचला कट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी
VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी