आनंदाची बातमी! यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचं संकट टळलं, राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के जलसाठा
राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे (Water Storage In All Dams). सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे.

नागपूर : राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे (Water Storage In All Dams). सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उकाड्यातही यंदा बहुतांश भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये (Maharashtra Water Problem Solved 47.72 Percent Water Storage In All Dams).
नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये 7 टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.
मे महिना उजाडला की राज्यातील बरीच धरणं तळाला लागलेली असतात आणि या भागात पाणीटंचाईचं संकट उभं राहतं. पण, यंदा चित्र सकारात्मक आहे. धरणं निम्मे भरलेली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची आता माहाराष्ट्राच्या जनतेला चिंता नाही.
राज्यातल्या कुठल्या विभागातील धरणात किती पाणीसाठा आहे? पाहुयात –
राज्यातील लघू, मध्यम, मोठ्या धरणातील पाणीसाठा किती?
विभाग | सध्याचा पाणीसाठा |
---|---|
अमरावती | 51.82 टक्के |
नागपूर | 52 टक्के |
औरंगाबाद | 58.35 टक्के |
कोकण | 51.35 टक्के |
नाशिक | 48.29 टक्के |
पुणे | 39.12 टक्के |
एकूण पाणीसाठा | 47.72 टक्के |
राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 47.72 टक्के पाणीसाठा आहे. काही धरणं निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्याची पाण्याची चिंता मिटली आहे.
पाऊस पडणार की पारा चढणार? आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अंदाजhttps://t.co/nS71lzg8FI#SuperComputer |#Will |#Predict |#WeatherForcast
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
Maharashtra Water Problem Solved 47.72 Percent Water Storage In All Dams
संबंधित बातम्या :
Weather report : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, कुठं शेतीचं नुकसान, तर कुठं वीज पडून मृत्यू
Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा