Maharashtra Weather Alert | पुढचे चार दिवस महत्त्वाचे, महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता
29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather forecast in upcoming four days there will rain in Maharashtra with thunderstorm and lightning)
पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे
महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांत पारा चांगलाच तापला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतोय. तसे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.
Severe weather warnings issued by IMD today for coming 5 days for all India. Most of the central India and Southern Peninsula looks to remain active with possibilities of thunderstorms and lightning with rains. Including Maharashtra place. pic.twitter.com/kDKHNnF47U
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 25, 2021
कोल्हापूरला पावसाने झोडपले
पुढील चार दिवसांच्या पावसाची चाहूल आज राज्यात काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस पडला. यावेळी जोरदार पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.
ठाण्यात शहापूरमध्ये अवकाळी पाऊस
आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातसुद्धा काही ठिकाणी पासवाच्या सरी बरसल्या. शहारपूरमधील खर्डी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दरम्यान, आगामी चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच शेतमाल व्यवस्थित ठिकाणी ठेवण्याचेसुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे.
इतर बातम्या :
केंद्राने मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट आणि निधी गेला कुठे?; प्रसाद लाड यांचा सरकारला सवाल.
(Maharashtra Weather forecast in upcoming four days there will rain in Maharashtra with thunderstorm and lightning)