ना फॉर्म भरण्याची अट, ना रांगेत उभे राहण्याची कटकट, कर्जमाफीसाठी फक्त एकच अट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा (farmer loan waiver)  केली.

ना फॉर्म भरण्याची अट, ना रांगेत उभे राहण्याची कटकट, कर्जमाफीसाठी फक्त एकच अट
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 7:12 PM

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा (farmer loan waiver)  केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी (farmer loan waiver)  सांगितलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कोणतेही हेलपाटे न घालता किंवा कोणतीही अट न घालता ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावे लागणार आहे ही एकच अट असेल असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?

  • राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत
  • ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
  • ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होईल
  • ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होईल.
  • शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल
  • कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही.
  • शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील
  • आधार लिंक असलेल्या खात्यात थेट कर्जमाफी मिळणार
  • मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु
  • मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना कर्जमाफी मिळणार
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पात्र असणार

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल? 

या कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंट देण्यात येतील. यासाठी कोणतीही ऑनलाईन नोंदी करावी लागणार नाही. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्याला कुठेही हेलपाटे घालावे लागणार नाही. तसेच कोणीही रांगेत उभे राहा. हे करा, ते करा असे यावेळी होणार नाही. असे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले.

गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांना पत्नीला घेऊन रांगेत उभे राहावे लागले होते. पण यावेळी असे होणार नाही.

कर्जमाफी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आयडेंटीफिकेशन करण्यासाठी बँकेत जावं (farmer loan waiver)  लागेल.

ज्यावेळी पैसे वर्ग करु, त्याने जाऊन त्याचे आयडेंटीफिकेशन करावं. असे दोन टप्पे आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितले की माझं नाव————————– हा माझा आधार कार्ड क्रमांक. त्यानंतर त्याचे थम इम्प्रेशन घेतलं जाईल आणि त्याच्या अकाऊंटवरची रक्कम वजा होईल.

त्यानंतर त्याला सर्टीफिकेट देण्याची व्यवस्था एकाच जागी एकाच वेळी करण्यात येणार आहे. त्याला महाराष्ट्रात जाऊन हेलपाटे घालण्याची गरज नाही.

 अर्थमंत्री जयंत पाटील यांचं ट्वीट

“आज आम्ही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही ही भूमिका घेतली आहे.

या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले आहे, असं ट्विट जयंत पाटील यांनी (farmer loan waiver)  केलं.

मुख्यमंत्र्यांची घोषणा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करत सभात्याग केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.