‘…अन् म्हणून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार’, आव्हाडांनी केला मोठा दावा
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं, त्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले, या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं, त्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले, या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर देखील जोरदार निशाणा साधला राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल. यांना सत्तेची आलेली मुजेरी ही जनतेला आवलेली नाही. वहिनींना बारामतीत थांबवणं, दाराबाहेर उभ करणं, अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करुन त्यांचं डोकं फोडणं, जागोजागी पैसे नेणं, विनोद तावडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी मिळतात हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कसे रुचेल असंं आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या शरद पवारांनी बारामती घडवली, त्यांच्या पत्नीला दाराबाहेर थांबवणं, आतमध्ये न जाऊ देन हे कुठल्या कायद्यात बसतं? हे माणुसकीच्या कायद्यात बसत नाही, माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली आहेत, सर्व भागातील आमदार निवडून येतील त्यांची सख्या 160 च्या वर असेल असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मी असणार असं म्हणण्याची प्रत्येकाला हौस असते, तेवढाच बोलण्यातून पाच मिनिटांचा आनंद मिळतो. काही जणांना आवडतं हे सगळं बोलायचा, मी मुख्यमंत्री होणार असं बोलल्यावर मला देखील आनंद मिळतो, असा खोचक टोला आव्हाड यांनी पटोलेंना लगावला आहे. एकनाथ शिंदे काय होणार, देवेंद्र फडणवीस काय होणार याच्याशी मला काही घेणं देणं नाही, आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचं बघायला जाऊ परिवर्तन होणार राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.